नाशिक लोकसभा मतदार संघ सुरुवातीपासूनच चर्चेत राहीला आहे. महायुतीमध्ये तर शेवटच्या क्षणा पर्यंत घोळ सुरू होता. इथून लढण्यास इच्छुक असलेल्या छगन भुजबळांनी आधी निवडणुकीतून माघार घेतली. मग ही जागा आपल्या पदरात पाडून घेण्यात शिंदेंना यश आलं. असं असलं तरी त्यांना शांतिगीरी महाराजांची उमेदवारी मागे घेण्यास अपयश आलं आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीने राजाभाऊ वाझे यांची उमेदवारी सर्वात आधी जाहीर केली. शिवाय प्रचारातही मुसंडी मारली. पण त्यामुळे नाराज झालेल्या विजय करंजकर यांची समजूत काढण्यास मात्र ठाकरेंना अपयश आलं. याच करंजकरांना शिंदेंना मात्र गळाला लावत ठाकरेंवर कुरघोडी केली. त्यामुळे सुरुवातीला एकीकडे झुकलेली ही लढत आता तुल्यबळ झाली आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
नाशिकमध्ये तिरंगी लढत
नाशिक लोकसभेत तिरंगी लढत होत आहे. शिवसेना शिंदे गटाने विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना पुन्हा रिंगणात उतरवलं आहे. गोडसे सलग दोन वेळा लोकसभेवर गेले आहेत. त्यांना यावेळी हॅट्रीक करण्याची संधी आहे. तर महाविकास आघाडीने ठाकरे गटाकडून राजाभाऊ वाझे यांना उमेदवारी दिली आहे. वाझे यांनी प्रचारात जोरदार मुसंडी मारली आहे. त्यांनी संपुर्ण मतदार संघ पिंजून काढला आहे. त्यांना उमेदवारी दिल्यामुळे विजय करंजकर हे नाराज झाले होते. ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळेल अशीच्यांची इच्छा होती. त्यांनी तयारीही केली होती. पण त्यांना ऐन वेळी डावलण्यात आले. त्यामुळे ते नाराज झाले. त्यांनी थेट शिंदे गटात प्रवेश केला. ही शिंदे यांच्यासाठी जमेची बाजू आहे. शिंदेंसाठी ही जमेची बाजू असली तरी शांतिगीरी महाराजांची उमेदवारी ही शिंदेंसाठी डोकेदुखी आहे. शांतिगीरी महाराजांनी शिवसेनेकडून उमेदवारी मिळावी म्हणून इच्छा व्यक्त केली होती. मात्र त्यांना उमेदवारी मिळाली नाही. शांतिगीरी महाराजांना मानणारा मोठा वर्ग या मतदार संघात आहे. त्याचा थेट फटका शिंदेंच्या उमेदवाराला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सध्याच्या स्थिती नाशिकमध्ये तुल्यबळ अशी तिरंगी लढत होत आहे.
हेही वाचा - शांतीगिरी महारांजाच्या पाठिंब्यासाठी उमेदवारांची गर्दी, कुणाला मिळणार कौल
सतत बदल करणारा मतदार संघ
नाशिक लोकसभा मतदार संघाचा इतिहास पाहिल्यास सतत बदलाला पाठबळ देणारा हा मतदार संघ आहे. एकदा निवडून दिलेला उमेदवार सलग दुसऱ्यांदा इथून निवडून आलेला नाही. भानुदास कवडे आणि हेमंत गोडसे हे त्याला अपवाद आहेत. यावेळी हे रेकॉर्ड तोडून हॅट्रीक करण्याची संधी गोडसे यांना आहे. ते आता हॅट्रीक करतात की नाशिककर इतिहासाची पुनर्रावृत्ती करतात ते पहावं लागले. तसे पाहीले तर हा एकेकाळी काँग्रेसचा गड राहीला आहे. काँग्रेसचे आठ वेळा खासदार या मतदार संघातून निवडून गेले आहे. यशवंतराव चव्हाणही या मतदार संघातून बिनविरोध निवडून गेले आहेत. काँग्रेसनंतर शिवसेना चार वेळा तर राष्ट्रवादीने दोन आणि भाजप एक वेळा या मतदार संघातून निवडून गेले आहेत.
हेही वाचा - भाजप सरकार आल्यानंतर रावसाहेब दानवेंना मिळणार मोठे गिफ्ट, अमित शाहांची घोषणा
मतदार संघात कोणाची किती ताकद?
नाशिक लोकसभा मतदार संघात नाशिक पूर्व, पश्चिम, मध्ये हे शहरातले तीन मतदार संघ आहेत. शिवाय सिन्नर, देवळाली आणि इगतपूर या जिल्ह्यातल्या तीन मतदार संघाचा समावेश होता. विशेष म्हणजे शिंदे गटाचा एकही आमदार या मतदार संघात नाही. तसे शिवसेना ठाकरे गटाचाही एकही आमदार नाही. शिंदे गटाची सर्व मदार ही भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर आहे. या मतदार संघात भाजपचे तीन आमदार आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आमदार आहेत. काँग्रेसचा एक आमदार आहे.
हेही वाचा - 'सुपाऱ्या, सेटींग अन् बरंच काही' राजन विचारेंचे खळबळजनक आरोप
गोडसे हॅट्रीक करणार का?
हेमंत गोडसे यांना उमेदवारीसाठी शेवटपर्यंत वाट पाहावी लागली होती. शेवटच्या क्षणी त्यांना उमेदवारी जाहीर झाली. त्यामुळे प्रचारात ते थोडे मागे होते. मागील दोन निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला आहे. त्यांना यावेळी हॅट्रीक करायची आहे. 2014 च्या निवडणुकीत त्यांनी छगन भुजबळ यांचा तर 2019 च्या निवडणुकीत समिर भुजबळ यांचा मोठा मताधिक्याने पराभव केला होता. यावेळची स्थिती वेगळी आहे. एकसंध शिवसेना फुटली आहे. त्यामुळे गोडसें समोर शिवसेनेचेचे आव्हान आहे. दोन शिवसैनिक एकमेकां समोर उभे ठाकले आहेत. तर दुसरीकडे शांतिगीरी महाराजांची उमेदवारीही गोडसेंसाठी डोकेदुखी ठरणार आहे. शिवाय छगन भुजबळ काय भूमिका घेतात यावरही त्यांचे भवितल्य अवलंबू आहे. कारण भुजबळांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांचे समर्थक नाराज आहेत.