ठाणे लोकसभा मतदार संघातलं वातावरण आता चांगलेच तापले आहे. आधी या मतदार संघात महायुतीचा उमेदवार कोण असणार याबाबत सस्पेन्स होता. शिवाय ही जागा शिवसेनेला की भाजपला याबाबतही तोडगा निघत नव्हता. मात्र आता यावर तोडगा निघाला आहे. नरेश म्हस्के यांनी शिवसेना शिंदे गटाने उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे ठाकरे गटाकडून राजन विचार तर शिंदे गटाकडून नरेश म्हस्के मैदानात आहेत. अशा वेळी प्रचारा दरम्यान आरोप आणि प्रत्यारोपांच्या जोरदार फैर झटत आहे. त्यात राजन विचारे यांनी एनडीटीव्ही मराठीला दिलेल्या मुलाखतीत नरेश मस्केंसह एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे ठाण्याचे वातावरण चांगलेच तापले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
आनंद आश्रमात काय चालतं?
राजन विचारेंनी आनंद आश्रम वाचवण्यासाठी काही केले नाही असा आरोप शिंदे गटाकडून झाला होता.या आरोपाला राजन विचार यांनी सडेतोड उत्तर देत नरेश म्हस्के यांनाच फैलावर घेतले आहे. नरेश म्हस्के हे राजकारणात आपल्या पेक्षा खुप लहान आहेत. आम्ही जनतेची कामं करत होतो त्यावेळी ते महापालिके सेटींगची काम करायचे असा हल्लाबोलच त्यांनी केला आहे. सेटींग शिवाय त्यांना काही माहित नाही. महापालिकेचे टेंडर कसे सेट करायचे, एखाद्याचे घर कसे उद्धवस्त करायचे, सुपाऱ्या कशा वाजवायच्या असे प्रकार ही मंडली आनंद आश्रमात बसून करतात असा आरोप त्यांनी केला आहे. त्यांच्या या वागण्यामुळेच ठाणेकर जनता आनंद आश्रमात जात नाही असेही ते म्हणाले.
हेही वाचा - विधान परिषदेच्या शिक्षक-पदवीधर मतदार संघाची निवडणूक जाहीर
'दिघेंच्या जवळच्या लोकांवर अन्याय'
आनंद दिघेंच्या जवळच्या लोकांना एकनाथ शिंदेंनीच जाणीव पूर्वक लांब ठेवले असा आरोपही राजन विचारे यांनी केला आहे. माजी महापौर रमेश वैती असतील की संजय मोरे असतील या दिघेंच्या जवळच्या लोकांना शिंदेंनी अडगळीत टाकले असेही ते म्हणाले. आनंद दिघें बरोर असणाऱ्यांना कधीही पुढे जाऊ दिले नाही, असंही त्यांनी सांगितले. दिघे साहेबांचे सर्व सैनिक आता आपल्या बरोबर असल्याचा दावा विचारे यांनी केला.
हेही वाचा - सुप्रिया सुळेंच्या कार्यकर्त्यांनी उधळला विजयाचा गुलाल, निवडणुकीच्या निकालाआधीच सेलिब्रेशन
'शिंदे काँग्रेसमध्ये जाणार होते'
एकनाथ शिंदे हे काँग्रेसमध्ये जाण्याच्या तयारीत होते. त्यांच्या बरोबर पाच आमदारही होते. मात्र काँग्रेसमध्ये जाऊन निवडून येऊ शकत नाही हे समजल्यावर ते पाच आमदार नॉट रिचेबल झाले. त्यामुळे काँग्रेस प्रवेशाचा शिंदेंचा प्लॅन फिस्कटला असा गौप्यस्फोट राजन विचारे यांनी केला आहे. आताही शिंदेंनी केलेले बंड हे स्वत; ची पापं झाकण्यासाठी केले आहे असेही विचारे यांनी स्पष्ट केले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world