केंद्रीय गृह मंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या भाषणाचा फेक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. या प्रकरणी दिल्ली पोलिस अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. या प्रकरणी एका काँग्रेस कार्यकर्त्याला अटक करण्यात आली आहे. ही अटक आसाममधून करण्यात आलीय. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांच्यासह 8 जणांना नोटीस बजावली आहे. या सर्वांना चौकशीसाठी दिल्लीला बोलावण्यात आले आहे. शिवाय येताना आपला मोबाईल बरोबर घेऊन येण्याच्या सुचना ही देण्यात आल्या आहेत.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अनेक राज्यात होणार चौकशी
दिल्ली पोलिसांच्या सुत्रांनी दिलेल्या माहिती नुसारा या प्रकरणाचा तपास अनेक राज्यांत करावा लागणार आहे. जो व्हिडीओ एडीट केला गेला आहे त्याच्या चौकशीसाठी झारखंड, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा, नागालँडसाठी दिल्ली पोलिसांची वेगवेगळी पथकं रवाना झाली आहेत. या प्रकरणी उत्तर प्रदेशातल्या समाजवादी पक्षाच्या उमेदवारालीही चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. शिवाय झारखंडमधील काँग्रेसच्या एका बड्या नेत्याचाही यात समावेश आहे. शिवाय नागालँडच्याही काँग्रेस पदाधिकाऱ्याला नोटीस पाठवण्यात आली आहे. त्यांना चौकशीला हजर रहावे असे सांगण्यात आले आहे. शिवाय मुंबईतही एका अज्ञात व्यक्तीच्या विरोधा तक्रार दाखल करण्यात आली आहे. महाराष्ट्र काँग्रेसच्या सोशल मीडिया अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर केला गेला होता.
हेही वाचा - ठाकरेंच्या सभेआधी राणेंची धमकी, कोकणातलं वातावरण तापलं
काय आहे संपुर्ण प्रकरण?
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. त्यात अमित शहा असे सांगताना दिसत आहे की जर भाजपचे सरकार आले तर एससी,एसटी आणि ओबीसींचे आरक्षण आम्ही समात्त करू टाकू, मात्र जेव्हा याची सत्यता तपासून पाहिली असता हा व्हिडीओ फेक असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर या विरोधाक तक्रार दाखल करण्यात आली. दरम्यान या प्रकरणी दिल्ली पोलिसांचे एक पथक तेलंगणात आहे. त्यांनी मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना नोटीस देऊन चौकशीला हजर राहाण्यास सांगितले आहे.
'नोटीसला घाबरणार नाही'
दरम्यान अमित शहांच्या फेक व्हिडीओ प्रकरणी आपल्याला दिल्ली पोलिसांनी नोटीस दिली आहे. या नोटीसला आपण घाबरत नाही असे रेवंत रेड्डी यांनी स्पष्ट केले आहे. मोदी आणि शहा निवडणूक जिंकण्यासाठी आधी ईडी आणि सीबीआयचा वापर करत होते. आता ते दिल्ली पोलिसांचाही वापर करत असल्याचा आरोप रेड्डी यांनी केला. शिवाय तेलंगणा आणि कर्नाटकमध्ये भाजपचा पराभव होत आहे त्यामुळे अशा कारवाई केली जात असल्याचे ते म्हणाले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world