जाहिरात

जुन्या सहकाऱ्यावर राज ठाकरे भडकले, गद्दार म्हणत थेट भिडले

दिलीप लांडे हे एकेकाळी मनसेचे नगरसेवक होते. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. राज यांनी त्यांचा उल्लेख गद्दार असा केला.

जुन्या सहकाऱ्यावर राज ठाकरे भडकले, गद्दार म्हणत थेट भिडले
मुंबई:

राज ठाकरे यांनी चांदीवली विधानसभा मतदार संघात आपले जुने सहकारी दिलीप लांडे यांना अक्षरश: शब्दांनी झोडून काढले. चांदीवली मतदार संघातून दिलीप लांडे यांना शिवसेना शिंदे गटाने उमदेवारी दिली आहे. दिलीप लांडे हे एकेकाळी मनसेचे नगरसेवक होते. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. राज यांनी त्यांचा उल्लेख गद्दार असा केला. या हरामखोराला काय दिलं नाही. नगरसेवक केलं, स्थायी समिती दिली, पण त्याने गद्दारी केली. या गद्दाराने केसाने गळा कापला आहे, त्याला अद्दल घडवा असे राज म्हणाले. यावेळी भाषण करताना ते दिलीप लांडे यांच्यावर प्रचंड भडकले होते. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

एक गद्दार, हरामखोर असा दिलीप लांडे यांचा राज यांनी उल्लेख केला.  या लोकांना काय नाही दिलं. नगरसेवक झाले. स्थायी समितीत बसले. बाकींच्याना संधी द्यावी म्हणून त्यांना बाजूला केलं. तर हा माणूस शिवसेनेकडे विकला गेला. सहा नगरसेवक घेवून विकला. त्यावेळी माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये होता. मी संकटकाळात होतो. त्यावेळी हा माणूस, हा लांड्या पैसे घेवून तिकडे विकला गेला. त्यांनी आमदारकी दिली. हा आमदार झाला. त्याच्यानंतर दुसरीकडे विकला गेला. अशी विकली जाणारी लोकं तुम्हाला हवी आहेत का? कोण विश्वास ठेवेल यांच्यावर. बिल्डरांच्या खिशातली ही माणसं आहेत. असा आरोप ही यावेळी राज यांनी केला.  

ट्रेंडिंग बातमी - 'भुजबळांना सर्व काही दिलं, त्यांनी मात्र धोका दिला' येवल्यात येवून पवारांनी पुढचा प्लॅन सांगितला

दिलीप लांडे यांचा उल्लेख त्यांना केसाने गळा कापणारा असा केला. त्यांना आता विकले गेल्याने बरेच पैसे मिळाले आहेत. तेच पैसे हे आता बाहेर काढतील. त्यामुळे त्याने पैसे दिले तर ते घ्या. पैसे घेवून त्याला जमिनदोस्त करा असा आदेशच त्यांनी उपस्थितांना केला. हा माणूस काय लायकीचा आहे याची आठवण करू देण्यासाठी मी चांदीवलीत सभा घेत असल्याचेही राज म्हणाले. ही माणसं कोणाची नसतात. ही माणसं कोणाच्या बापाचेही नाहीत. ते कोणाचेही होवू शकत नाहीत. ते केसाने तुमचाही गळा कापायला मागे पुढे पाहाणार नाहीत असं राज म्हणाले. संपूर्ण भाषणात त्यांनी दिलीप लांडे यांच्यावर हल्लाबोल केला. 

ट्रेंडिंग बातमी - 'सगळंच उकरायला गेले तर, बात बहुत लंबे तक जायेगी' पवार- भुजबळांत जुंपली

यावेळी त्यांनी काँग्रेस उमेदवार नसिम खान यांच्यावरही टीका केली. एक केसाने गळा कापणारा इथं उभा आहे. तर दुसरा धर्माने गळा कापणारा आहे. मुंबईत मोठ्या प्रमाणात बांगलादेशी आणि रोहिंगे येत आहेत. काही काळाने मुंबईतल्या हिंदूंची संख्या पन्नास टक्क्यां पेक्षा कमी होईल. त्यावेळी हे नसिम खान वैगरे त्यांनाच पाठिंबा देतील. देश आणि धर्मा यात ते धर्माला प्राधान्य देतात असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले. त्यामुळे मनसेच्या उमेदवाराला विजयी करा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांनाही लक्ष केलं. मुख्यमंत्री व्हायचं म्हणून त्यांनी काँग्रेस बरोबर हात मिळवणी केली. असंही राज या वेळी म्हणाले. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com