जाहिरात

आम्ही देखील देवीला बोकड देतो, 100 देवळं फिरतो - जितेंद्र आव्हाड

Jitendra Awhad on secularism : आव्हाड घरामध्ये देवधर्म करतायत असा व्हिडिओ मध्यंतरी व्हायरल झाला होता.

आम्ही देखील देवीला बोकड देतो, 100 देवळं फिरतो - जितेंद्र आव्हाड
मुंबई:


राज्यातील पुरोगामी नेत्यांमध्ये जितेंद्र आव्हाड यांचं नाव घेतलं जातं. वेगवेगळ्या पुरोगामी संघटनांशी त्यांचा जवळचा संबंध आहे.  आव्हाड घरामध्ये देवधर्म करतायत असा व्हिडिओ मध्यंतरी व्हायरल झाला होता. NDTV मराठीवरील महाराष्ट्राचा जाहीरनामा या कार्यक्रमात आव्हाड  सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांना या विषयावर प्रश्न विचारण्यात आला. त्या प्रश्नाचं उत्तर देताना आव्हाड यांनी आम्ही देखील मंदिरात जातो. देवीला नैवेद्य म्हणून बोकड देतो, याची माहिती दिली आहे. त्याचबरोबर सेक्युलेरिझमची तुमची व्याख्या बदला असा सल्ला देखील त्यांनी दिला आहे.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय म्हणाले आव्हाड?

'पुरोगामीत्व म्हणजे निरश्वरवादी आहे का? हे तुमचं नवीन काय सुरु झालं आहे मला कळत नाही. आमची पण कुलदैवत-कुलदेवी आहेत, आम्ही तिला बकरा देतो, नैवेद्य देतो. आमच्या घरात हे सुरुच असतं. माझी बायको तर ब्राह्मण आहे. ठीक आहे, सारस्वत ब्राह्मण आहे, पण ब्राह्मण आहे ना.

तुम्ही सेक्युलेरिझमला एक ठपका मारलाय  की ते निरेश्वरवादी आहेत, देवाला मानतच नाहीत.  तसं नाहीय, हो. फक्त देवाकडं जाताना ढोलताशा वाजवून टीव्ही वाल्यांना आम्ही घेऊन जात नाही. मी साईबाबांना जातो. मी शंकर महाराजांना जातो. मी तुळजापूरला जातो. मी गाणगापूरला जातो. मी जेजुरीला जातो. मी महाकाळला जातो. मी अशी 100 देवळं फिरत असतो. पण हे सर्वांना सांगून जाणं आपल्याला कुणी शिकवलं नाही. 

Exclusive : एकनाथ शिंदेच्या बंडाची ठिणगी कधी पडली? फडणवीसांनी सांगितली 'त्या' रात्रीची गोष्ट

( नक्की वाचा :  Exclusive : एकनाथ शिंदेच्या बंडाची ठिणगी कधी पडली? फडणवीसांनी सांगितली 'त्या' रात्रीची गोष्ट )

तुमचा धर्म, तुमचा देव तुम्ही माना ना कोण विरोध करतंय. सेक्युलेरिझमची व्याख्या तुम्ही बदला. आम्ही सेक्युलर आहोत याचा अर्थ तुझा धर्म हा माझ्या धर्मा इतकाच मोठा आहे. तुझ्या भावना या माझ्या भावनेसारख्याच मोठ्या आहेत. त्या माझ्यापेक्षा कमी नाहीत. त्यापेक्षा जास्त नाहीत. प्रत्येक धर्माला समतेची वागणूक द्या त्याचा सन्मान करा तोच सेक्युलेरिझम,ट असं आव्हाड यांनी या विषयावरील प्रश्नाचं उत्तर देताना स्पष्ट केलं. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: