जाहिरात

लातूरमध्ये विलासरावांच्या मुलासमोर भाजपाचं तगडं आव्हान, थेट लढतीचा निकाल काय लागणार?

Latur Rural Assembly Election 2024 : विलासराव देशमुखांचे कनिष्ठ चिरंजीव धीरज देशमुख यांना यंदा तगडं आव्हान आहे.

लातूरमध्ये विलासरावांच्या मुलासमोर भाजपाचं तगडं आव्हान, थेट लढतीचा निकाल काय लागणार?
लातूर:

सुनील कांबळे, प्रतिनिधी

लातूर विधानसभा मतदारसंघाची 2008 साली विभागणी करुन लातूर ग्रामीण या मतदारसंघाची निर्मिती करण्यात आली. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे कनिष्ठ चिरंजीव धीरज देशमुख सध्या या मतदारसंघाचे आमदार आहेत.  आगामी विधानसभा निवडणुकीत  लातूर ग्रामीण मतदार संघात चार प्रमुख पक्षांचे उमेदवार रिंगणात आहेत. काँग्रेसचे विद्यमान आमदार धीरज देशमुख यांना काँग्रेस पक्षाने दुसऱ्यांदा संधी दिली आहे. भाजपाकडून आमदार रमेश कराड, मनसेकडून संतोष नागरगोजे आणि वंचित बहुजन आघाडीकडून डॉ. विजय अजनीकर हे उमेदवार आहेत. पण, प्रमुख लढत काँग्रेस विरुद्ध भाजपा अशीच होणार आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

नोटाला दुसऱ्या क्रमांकाची मतं

लातूर ग्रामीण मतदारसंघावर सुरुवातीपासूनच काँग्रेसचं वर्चस्व आहे. 2009 साली वैजनाथ शिंदे, 2014 मध्ये त्र्यंबक भिसे तर 2019 च्या निवडणुकीत धीरज देशमुख असे काँग्रेसचे तीन वेगवेगळे उमेदवार या मतदारसंघातून निवडून आले आहेत. 

सध्या भाजपचे उमेदवार असलेले रमेश कराड यांना दोन वेळा या मतदारसंघातून पराभव सहन करावा लागला आहे. मागील निवडणुकीत हा मतदारसंघ शिवसेनेकडं होता. शिवसेनेचे सचिन देशमुख धीरज देशमुखांच्या विरोधात रिंगणात होते. 

लातूर ग्रामीण मतदार संघाचा उमेदवार हा मॅनेज उमेदवार आहे असा संदेश मागील निवडणुकीत मतदारांपर्यंत गेला होता. त्यामुळे नाराज झालेल्या मतदारांनी थेट नोटालाच मतदान केलं.  त्यामुळे धीरज देशमुख यांच्या पाठोपाठ सर्वाधिक मतं ही नोटालाच पडली होती.  

( नक्की वाचा : लातूरमध्ये देशमुखांच्या गढीला चाकूरकरांच्या सुनेचं आव्हान, पुढच्या पिढीतील लढतीकडं राज्याचं लक्ष )

काय आहेत समस्या ?

लातूर ग्रामीण मतदारसंघावर काँग्रेसची एकहाती सत्ता आहे. त्यानंतरही येथील अनेक समस्या आजही जैसे थे आहे. ग्रामीण भागातील शेत रस्ते त्याचबरोबर शहराला जोडणारे प्रमुख रस्ते गावातील अंतर्गत रस्ते यांच प्रश्न प्रलंबित आहे. रेणापूर-पानगाव मतदारसंघ 40 वर्षांपासून रखडलेला आहे. ग्रामीण भागामध्ये सोयाबीन, तूर, उडीद, मूग यासारखी पिकं शेतकरी घेतात. पण, सोयाबीनला भाव नसल्यानं ते हवालदिल झाले आहेत. ग्रामीण भागातील तरुणांच्या रोजगाराचा प्रश्नही प्रलंबित आहे.  

कशी आहे लढत?

यावेळी काँग्रेसने धीरज देशमुख यांना दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवलंय.  तर भाजपकडून विधानपरिषदेचे आमदार असलेले रमेश कराड यांना पुन्हा संधी देण्यात आलीय. मनसे आणि वंचितचे उमेदवार रिंगणात असले तरी काँग्रेस आणि भाजपा या दोन प्रमुख पक्षांमध्ये यंदा थेट लढत होणार आहे. 

'तुमच्या राष्ट्रीय नेत्याचं लग्न झालं नाही आणि हे...', धनंजय मुंडेंचा विरोधकांना टोला

( नक्की वाचा : 'तुमच्या राष्ट्रीय नेत्याचं लग्न झालं नाही आणि हे...', धनंजय मुंडेंचा विरोधकांना टोला )

काय आहेत समीकरणं?

मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना, विलास साखर कारखाना, ट्वेंटीवन साखर कारखाना आणि रेना साखर कारखाना असे कारखाने या मतदारसंघांमध्ये असल्याने सहाजिकच ग्रामीण भागातील शेतकरी या कारखान्यांचा सभासद आहेत. हे सर्व कारखाने काँग्रेसच्या हाती असल्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची व्होट बँक साहजिकच काँग्रेसकडं वळली जाते.

तर दुसरीकडे, गोपीनाथरा मुंडे यांना मानणारा वर्ग या मतदारसंघांमध्ये आहे. त्याचबरोबर रमेश कराड यांच्या समर्थकांची संख्याही लक्षणीय आहे. त्यांच्या जोरावर कराड देशमुखांना धक्का देण्यात यशस्वी होणार का? हे 23 तारखेला स्पष्ट होईल. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: