Dharashiv Osmanabad Lok Sabha Elections 2024 Result : मराठवाड्यातील धाराशिव मतदारसंघात ओमराजे निंबाळकर यांनी इतिहास घडवलाय. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे उमेदवार ओमराजे यांनी त्यांच्या भावजय आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अर्चना पाटील यांचा पराभव केलाय. निवडणूक आयोगाच्या शेवटच्या अपडेटनुसार ओमराजे यांनी अर्चना पाटील यांच्यावर तब्बल 2 लाख 71 हजार 848 मतांनी आघाडी घेतली होती. धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या इतिहासात कोणत्याही उमेदवाराला मिळालेलं हे सर्वाधिक मताधिक्य आहे.
एकाच घरातील तिघांचा केला पराभव
माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांचा धाराशिव जिल्हा हा बालेकिल्ला होता. ओमराजे निंबाळकर यांनी पद्मसिंह यांच्या घरातील 3 जणांना निवडणुकीत पराभूत केलं आहे. ओमराजेंनी सर्वात पहिल्यांदा 2009 च्या विधानसभा निवडणुकीत पद्मसिंह पाटील यांचा पराभव केला होता. त्यानंतर मागील लोकसभा निवडणुकीत पद्मसिंह यांचे चिरंजीव राणा जगजीत सिंह यांचा 2019 मधील लोकसभा निवडणुकीत पराभव केला होता. तर यंदाच्या निवडणुकीत त्यांनी राणा जगजीत सिंह यांचा पराभव करुन हॅटट्रिक पूर्ण केलीय.
( नक्की वाचा : बारामती शरद पवारांचीच! संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या निवडणुकीत सुप्रिया सुळे विजयी )
धाराशिव लोकसभा मतदारसंघ भाजपा लढवणार अशी चर्चा होती. बसवराज पाटील आणि माजी सनदी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी यांची नावं चर्चेत होती. ऐनवेळी भाजपा आमदार राणा जगतसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि तिकीट मिळवलं. महायुतीचं हे डावपेच फसल्याचं या निकालातून स्पष्ट झालंय.
मोदींच्या सभेनंतरही पराभव
धाराशिव मतदारसंघाततील सहापैकी पाच (औसा, उमरगा, तुळजापूर, परंडा आणि बार्शी) या पाच मतदारसंघात महायुतीचे आमदार आहेत. तर धाराशिवची एकमेव जागा महाविकास आघाडीकडं आहे. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी या मतदारसंघात अर्चना पाटील यांच्याकरता सभांचा धडाका लावला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील अर्चना पाटील यांच्यासाठी सभा घेतली होती. या सर्व प्रयत्नानंतरही महायुतीला ही जागा आपल्याकडं खेचण्यात अपयश आलं आहे.
( नक्की वाचा : 'रोलर कोस्टर' सारख्या लढतीत वर्षा गायकवाड यांची बाजी, अखेरच्या टप्प्यात मोठा ट्विस्ट )
गेल्या पाच वर्षातील काम, वैयक्तिक संपर्क आणि महाविकास आघाडीचे पारंपरिक मतदार यावर ओमराजेंची मदार होती. मतदारांनीही ओमरांचेवर पुन्हा एकदा विश्वास दाखवत त्यांना खासदार केलं आ
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world