जाहिरात
This Article is From Apr 26, 2024

दुसऱ्या टप्प्यातील सर्वात श्रीमंत उमेदवार 622 कोटींचा मालक, नांदेडमधील उमेदवार सर्वात गरीब

दुसऱ्या टप्प्यात असे काही उमेदवारी आहेत की ज्यांची संपत्ती शेकडो कोटींमध्ये आहेत. तर असे उमेदवार आहेत ज्यांनी संपत्ती नाममात्र आहे. 

दुसऱ्या टप्प्यातील सर्वात श्रीमंत उमेदवार 622 कोटींचा मालक, नांदेडमधील उमेदवार सर्वात गरीब

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात आज (26 एप्रिल)  मतदान होत आहे. यामध्ये 13 राज्यातील 89 जागांवर मतदान झालं. लोकसभा निवडणूक यंदा सात टप्प्यात होत आहे. दुसऱ्या टप्पात केरळमधील सर्व 20, कर्नाटकात 28 पैकी 14, राजस्थान 13, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातील प्रत्येकी 8, मध्य प्रदेश 7, आसाम आणि बिहारमधील 5-5, छत्तीसगड आणि पश्चिम बंगालमधील प्रत्येकी 3, मणिपूर, त्रिपूरा आणि जम्मू काश्मीरमधील 1-1 जागांवर मतदान होत आहे.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा )

दुसऱ्या टप्प्यात अनेक नेत्यांचं भवितव्य आज ईव्हीएम मशीनमध्ये कैद होणार आहे. अनेक दिग्गज नेत्यांची प्रतीष्ठा पणाला लागली आहे, त्यामुळे ते चर्चेत आहेत. तर असे काही उमेदवार आहेत जे त्यांच्या संपत्तीमुळे चर्चेत आहेत. दुसऱ्या टप्प्यात असे काही उमेदवार आहेत की ज्यांची संपत्ती शेकडो कोटींमध्ये आहेत. तर असे उमेदवार आहेत ज्यांनी संपत्ती नाममात्र आहे. 

(नक्की वाचा : सुनेत्रा पवारांना क्लीन चिट, 25 हजार कोटींच्या घोटाळ्याचा होता आरोप )

देशातील दुसऱ्या टप्प्यातील श्रीमंत उमेदवार 

  1. कर्नाटकमधील काँग्रेसचे वेंकटरमणे गौडा हे दुसऱ्या टप्प्यातील सर्वात श्रीमंत उमेदवार आहेत. ज्यांची संपत्ती जवळपास 622 कोटी आहे. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) आणि शपथपत्राद्वारे ही माहिती समोर आली आहे. 
  2. काँग्रेसचे कर्नाटकातील विद्यमान आमदार डीके सुरेश दुसरे सर्वात श्रीमंत उमेदवार आहेत. त्यांची संपत्ती जवळपास 593 कोटी एवढी आहे. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांचे ते बंधू आहेत. 
  3. मथुरा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार हेमा मालिनी या तिसऱ्या स्थानावर आहेत. त्यांची संपत्ती 278 कोटी आहे. 
  4. मध्य प्रदेशचे काँग्रेस नेते संजय शर्मा यांची संपत्ती 232 कोटी आहे. ते या श्रीमंत उमेदवारांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहेत. 
  5. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी या यादीत पाचव्या क्रमांकावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती 217 कोटी आहे. 

(नक्की वाचा- मतदाराने कुऱ्हाडीने फोडलं EVM, नांदेडमधील मतदान केंद्रात प्रचंड गोंधळ)

दुसऱ्या टप्प्यातील सर्वात गरीब उमेदवार

  1. महाराष्ट्रातील नांदेडमधील अपक्ष उमेदवार लक्ष्मण पाटील हे दुसऱ्या टप्प्यातील सर्वात गरीब उमेदवार आहेत. त्यांच्या शपथपत्रानुसार त्यांची संपत्ती 500 रुपये आहे. 
  2. गरीब उमेदवांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर केरळच्या कासरगोड येथील राजेश्वरी केआर आहेत. त्यांच्याकडे 1000 रुपयांची संपत्ती आहे. 
  3. तिसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्रातील अमरावतीचे अपक्ष उमेदवार पृथ्वीसम्राट मुकिंदराव दीपवंश आहेत. त्यांचा एकूण संपत्ती 1400 रुपये आहे. 
  4. राजस्थानच्या जोधपूरमधून दलित क्रांती दलाचे शाहनाज बानो यांच्याकडे 2000 रुपयांची संपत्ती आहे. 
  5. केरळमधून सोशलिस्ट युनिटी सेंटर ऑफ इंडिया पक्षाद्वारे व्हीपी कोचुमोन निवडणुकीच्या मैदानात आहेत. त्यांची एकूण संपत्ती 2230 रुपये आहे. 
     

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: