Lok Sabha Election 2024: राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदान मंगळवारी (7 मे) पार पडलं आहे. तिसऱ्या टप्प्यात देखील मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवल्याचं आकडेवारीतून दिसून आलं आहे. देशभरातील आकडेवारीच्या तुलनेत राज्यातील मतदारांनी निरुत्साह दाखवला आहे. निवडणूक आयोगाच्या अंदाजे आकडेवारीनुसार, देशभरात 61.69 टक्के मतदान झालं आहे. यामध्ये सर्वात कमी 54.09 टक्के मतदान महाराष्ट्रात झालं आहे. तर आसाममध्ये सर्वात जास्त 75.30 टक्के मतदान झालं आहे. मतदानाचा हा आकडा अंदाजे आहे, यामध्ये काहीसा बदल होऊ शकतो.
राज्यात मागील निवडणुकीच्या तुलनेत मतदानात बराच फरक दिसून येत आहे. वाढत्या उन्हाचा फटका मतदानाला बसल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र कमी झालेली मतदानाही ही आकडेवारी कुणाच्या पथ्यावर पडणार हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे. निवडणुकीच्या निकाल 28 दिवसांनंतर 4 जून रोजी जाहीर होणार आहे.
(नक्की वाचा: EVMची पूजा करणे महागात पडलं, राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकरांविरोधात गुन्हा दाखल)
राज्यातील मतदानाची आकडेवारी (अंदाजे)
मतदारसंघ | 2024 ची टक्केवारी | 2019 ची टक्केवारी |
बारामती | 64.08 टक्के | 47.84 टक्के |
सांगली | 52.56 टक्के | 84 टक्के |
कोल्हापूर | 63.71 टक्के | 74.02 टक्के |
रत्नागिरी-सिंधुदुर्ग | 53.75 टक्के | 65.06 टक्के |
सातारा | 54.11 टक्के | 64.01 टक्के |
सोलापूर | 49.17 टक्के | 62.04 टक्के |
रायगड | 50.31 टक्के | 64.09 टक्के |
धाराशिव | 55.98 टक्के | 68.01 टक्के |
माढा | 50.00 टक्के | 68.08 टक्के |
हातकणंगले | 62.18 टक्के | 74.04 टक्के |
लातूर | 55.38 टक्के | 65.06 टक्के |
राज्यातील प्रमुख लढती
- बारामती - सुप्रिया सुळे (शरद पवार गट) विरुद्ध सुनेत्रा पवार (राष्ट्रवादी काँग्रेस)
- रत्नागिरी-सिंधुदुर्ग - नारायण राणे (भाजप) विरुद्ध विनायक राऊत (ठाकरे गट)
- सातारा- उदयनराजे भोसले (भाजप) विरुद्ध शशिकांत शिंदे (शरद पवार गट)
- रायगड- सुनील तटकरे (राष्ट्रवादी काँग्रेस) विरुद्ध अनंत गीते (ठाकरे गट)
- माढा- धैर्यशील मोहिते पाटील (शरद पवार गट) विरुद्ध रणजीतसिंह नाईक निंबाळकर (भाजप)
- कोल्हापूर - संजय मंडलिक (शिवसेना) विरुद्ध शाहू महाराज (काँग्रेस)
- सांगली- चंद्रहार पाटील (ठाकरे गट) विरुद्ध संजयकाका पाटील (भाजप) विरुद्ध विशाल पाटील (अपक्ष)
- सोलापूर- प्रणिती शिंदे (काँग्रेस) विरुद्ध राम सातपुते (भाजप)
- धाराशिव- ओमराजे निंबाळकर (ठाकरे गट) विरुद्ध अर्चना पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस)
- लातूर - सुधाकर श्रुगांरे (भाजप) विरुद्ध डॉ. शिवाजी काळगे (काँग्रेस)
- हातकणंगले - धैर्यशील माने (शिवसेना) विरुद्ध राजू शेट्टी (स्वाभिमानी) विरुद्ध सत्यजित पाटील (ठाकरे गट)
(नक्की वाचा: सोलापुरातील दोन गावात मतदान झालंच नाही; निवडणूक प्रशासन हैराण)
देशभरातील आकडेवारी
- आसाम - 75.30 टक्के
- गोवा - 74.35 टक्के
- पश्चिम बंगाल - 73.93 टक्के
- बिहार- 56.55 टक्के
- छत्तीसगड - 61.16 टक्के
- दादर नगर हवेली आणि दिव दमण- 65.23 टक्के
- गुजरात - 56.86
- कर्नाटक - 68.67 टक्के
- मध्य प्रदेश - 63.32 टक्के
- महाराष्ट्र - 54.98 टक्के
- उत्तर प्रदेश - 57.34 टक्के
(नक्की वाचा: शिवीगाळ, दमदाटी, धमकी; माझ्याशिवाय आहे कोण? अजित पवार गटाच्या आमदाराची दादागिरी, VIDEO)
VIDEO: सांगोल्यात EVM जाळण्याचा प्रयत्न, व्हिडीओ आला समोर
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world