देवा राखुंडे, इंदापूर
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे इंदापूरचे आमदार आणि माजी राज्यमंत्री दत्ता भरणे यांच्या दादागिरीची एक व्हिडीओ समोर आला आहे. गावात घुसून एका व्यक्तीला शिवीगाळ करत धमकी देत असल्याचं दिसतं आहे. इंदापूर तालुक्यातील अंथुर्णे गावातील हा प्रकार आहे. आमदार रोहित पवार यांनी हा व्हिडीओ आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
इंदापूर तालुक्यातील अंथुर्णे येथील ग्रामपंचायत इमारतीच्या आवारातील हा व्हिडिओ आहे. व्हिडीओत दिसत आहेत की दत्ता भरणे समोरच्या एका व्यक्तीला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत आहे.
(नक्की वाचा- 'केजरीवालांनी 100 कोटींची मागणी केली हे दाखवू शकतो, सर्वोच्च न्यायालयात ASG चा दावा)
केवळ दडपशाहीपुढं न झुकता स्वाभिमानाने बुथवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना अजितदादा मित्र मंडळाचे सदस्य, माजी मंत्री आणि इंदापूरचे आमदार हे कशा अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करतात आणि धमकी देतात ते या व्हिडिओत बघा… विशेष म्हणजे ज्यांच्याशी ते असं वागतात ही त्यांचीच भावकी आणि बारा… pic.twitter.com/5ECFw7EnCx
— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 7, 2024
निवडणूक संपल्यानंतर माझ्याशी गाठ आहे. गावात कोणाला सोपं नाही, वाटच लावेन. निवडणुका होतील सहा नंतर तुम्हाला माझ्याशिवाय कोण आहे असंही ते म्हणत आहेत. जास्त मस्ती केली तर मस्ती उतरवेन, असंही दत्ता भरणे समोरच्या व्यक्तीला बोलताना दिसत आहेत.
( नक्की वाचा : निवडणूक लढण्यासाठी पैसे नसल्याचं सांगत काँग्रेस उमेदवारानं घेतला अर्ज मागं )
रोहित पवारांनी काय म्हटलं?
केवळ दडपशाहीपुढं न झुकता स्वाभिमानाने बुथवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना अजितदादा मित्र मंडळाचे सदस्य, माजी मंत्री आणि इंदापूरचे आमदार हे कशा अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करतात आणि धमकी देतात ते या व्हिडिओत बघा. विशेष म्हणजे ज्यांच्याशी ते असं वागतात ही त्यांचीच भावकी आणि बारा बलुतेदारांपैकी एक आहेत. ही चिडचिड खूप काही सांगून जाते. पण आजच्या लढाईत स्वाभिमानी कार्यकर्ता आणि मतदार कोणत्याही धमक्यांना आणि दपडशाहीला भीक घालणार नाही!, असं रोहित पवारांना ट्वीट करत म्हटलं आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world