जाहिरात
This Article is From May 20, 2024

पाचव्या टप्प्यात 49 जागांवर मतदान सुरू; 'या' हॉट मतदारसंघांवर सर्वांचीच नजर

सहा राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेशाच्या 49 लोकसभा जागांवर आज मतदान सुरू आहे.

पाचव्या टप्प्यात 49 जागांवर मतदान सुरू; 'या' हॉट मतदारसंघांवर सर्वांचीच नजर
नवी दिल्ली:
  1. सहा राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेशाच्या 49 लोकसभा जागांवर आज मतदान पार पडत आहे. पाचव्या टप्प्यात उत्तर पदेशातील 14, महाराष्ट्रातील 13, पश्चिम बंगालमधील 7, बिहार आणि ओडिसातील पाच-पाच, झारखंड-जम्मू काश्मीर आणि लडाखमध्ये एक-एक जागेवर मतदान होत आहे. सकाळी 7 वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली असून सायंकाळी 6 वाजता मतदान समाप्त होईल. 
  2. या टप्प्यात दोन हाय प्रोफाइल जागा रायबरेली आणि अमेठीमध्ये मतदान सुरू आहे. रायबरेलीतून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि अमेठीतून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी मैदानात आहेत. 
  3. पाचव्या टप्प्यात 4.26 कोटी महिला आणि 5,409 तृतीयपंथी मतदारांसह 8.95 कोटींहून अधिक नागरिक मतदान करण्यासाठी पात्र आहेत. 94,732 मतदान केंद्रावर 9.47 लाख मतदान अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. 
    Latest and Breaking News on NDTV
  4. लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील प्रमुख उमेदवारांमध्ये अनेकांचा समावेश आहे. ज्यात राजनाथ सिंह (लखनऊ, उत्तर प्रदेश), पीयूष गोयल (मुंबई उत्तर, महाराष्ट्र), साध्वी निरंजन ज्योती (फतेहपुर, उत्तर प्रदेश) आणि शांतनु ठाकुर (बनगांव, पश्चिम बंगाल), लोजपा (रामविलास) चे नेता चिराग पासवान (हाजीपुर, बिहार), शिंदे गटाचे श्रीकांत शिंदे (कल्याण, महाराष्ट्र) आणि  भाजपाचे राजीव प्रताप रूडी आणि राजद अध्यक्ष लालू प्रसाद यांची मुलगी रोहिणी आचार्य (दोन्ही सारण, बिहार) याचा समावेश आहे. 
  5. केरळच्या वायनाडमधून निवडणूक लढवणारे राहुल गांधी यंदा नेहरू-गांधी कुटुंबाचा गढ रायबरेलीमधून निवडणूक लढवत आहे. या लोकसभेचं प्रतिनिधीत्व यापूर्वी त्यांची आई सोनिया गांधी करीत होत्या. भाजपने उत्तर प्रदेशातील मंत्री दिनेश प्रताप सिंह यांना या जागेवरुन मैदानात उतरवलं आहे. 
  6. अमेठीमधून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी निवडणुकीच्या मैदानात आहेत. तर गांधी कुटुंबाचे निकटवर्तीय केएल शर्मा यांना काँग्रेसने निवडणुकीच्या मैदानात उतरवलं आहे. लखनऊमधून संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या चौथ्या कार्यकाळाकडे लक्ष आहे. त्यांची लढत सपाचे सद्याचे आमदार रविदार मेहरात्रा यांच्याशी आहे. 
  7. जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये 22 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. राज्यातील माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्लादेखील या जागेवरुन निवडणूक लढत आहेत. या मतदारसंघात 17.37 लाख मतदार असून लडाखमध्ये काँग्रेस उमेदवार सेरिंग नामग्याल, भाजपचे ताशी ग्यालसन आणि अपक्ष उमेदवार हाजी हनिफा जान यांच्यामध्ये मोठी लढत आहे.  
  8. पश्चिम बंगालच्या सात लोकसभा मतदारसंघात मतदान सुरू आहे. राज्याच्या बनगाव, बैरकपूर, हावडा, उलुबेरिया, सेराम्पूर, हुगळी आणि आरामबाग लोकसभा जागांवर मतदान आहे. बैरकपूरात भादप उमेदवार अर्जुन सिंह यांची लढत तृणमूल काँग्रेसचे पार्थ भौमिक आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (माकप) च्या देवदूत घोष यांच्याशी आहे. 
  9. बिहारच्या पाच लोकसभा जागा सारण, मुजफ्फरपूर, हाजीपूर, सीतामढी आणि मधुबनीमध्ये मतदान होत आहे. हाजीपुरातून चिराग पासवान निवडणूक लढत आहे. 
  10. झारखंडमध्ये तीन लोकसभा जागा आणि गांडेय विधानसभा जागांच्या पोटनिवडणुकीत मतदान सुरू आहे. ओडिसाच्या 35 विधानसभामध्येही मतदान सुरू आहे. येथे बीजद अध्यक्ष आणि मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचा उमेदवारांमध्ये समावेश आहे. 
Listen to the latest songs, only on JioSaavn.com