Devendra Fadnavis Security : राज्यातील 288 विधानसभा मतदासंघातील निवडणूक 20 नोव्हेंबर रोजी होणार आहे. या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत संपली आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून सध्या जोरदार प्रचार सुरु आहे. राज्यातील भाजपाच्या प्रचाराची धुरा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खांद्यावर आहे. प्रचाराची रणधुमाळी सुरु असतानाच फडणवीसांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
गुप्तचर यंत्रणांच्या अलर्टनंतर देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 'फोर्स वन'चे 12 जवान देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत तैनात करण्यात आले आहेत. या प्रकरणात केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी एकापाठोपाठ एक दोन अलर्ट दिले आहेत, अशी माहिती राज्य गृह खात्यातील वरिष्ठ सुत्रांनी दिली आहे.
केंद्रीय गुप्तचर यंत्रणांकडे जी माहिती येते, त्यातील काही संभाषणातून 'अल्ट्रा फोर्सेस'कडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जीवाला धोका आहे आणि तसा कट आखण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली होती. ही माहिती केंद्रीय गुप्तचर यंत्रणांकडून राज्यातील यंत्रणांना देण्यात देण्यात आली. त्यामुळे राज्याचे पोलिस दल सतर्क झाले आणि त्यांनी तत्काळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेचा संपूर्ण आढावा घेतला. आणि त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
( नक्की वाचा : Gopal Shetty : गोपाळ शेट्टी माघार घेणार? भाजपा नेत्यानं दिले मोठे संकेत )
देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थान, नागपूर येथील निवासस्थान तसेच त्यांच्या कार्यक्रमात सुरक्षा देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world