भाजप नेते रावसाहेब दानवे आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार यांचे नाते संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. लोकसभा निवडणुकीत सत्तारांनी रावसाहेब दानवे यांच्या पराभवाला हातभार लावला होता. त्याचा उल्लेखही सत्तार यांनी केला होता. विधानसभेला आम्हीही बघून घेवू अशी भूमीका त्यानंतर दानवे यांनी घेतली होती. त्यानंतर या दोघांमधील वाद टोकाला गेला होता. आता विधानसभा निवडणूक होत आहे. मात्र यांच्यातला वाद काही शमताना दिसत नाही.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
विधानसभा निवडणुकीत सिल्लोडमध्ये भाजपने युतीचा धर्मा पाळला नाही तर इतर मतदार संघात भाजपला बघून घेवू असा इशारा सत्तार यांनी दिला होता. सिल्लाडमध्ये सत्तारांची नाकाबंदी करण्यासाठी दानवे यांनीच पुढाकार घेतल्याची चर्चा आहे. लोकसभेचा बदला विधानसभेला घेण्याची रणनीती दानवे यांची आहे. मात्र सत्तार यांना आता युती धर्माची आठवण झाली आहे. त्यांनी जर युती धर्म पाळला नाही तर त्याचे परिणाम भोगावे लागतील असं थेट सुनावलं आहे.
ट्रेंडिंग बातमी - पवार कुटुंबात दुरावा वाढला? ऐन दिवाळीत बारामतीत काय झालं?
यावर दानवे यांनीही सत्तार यांच्यावर पलटवार केला आहे. इतर मतदार संघात पाहून घेवू या सत्तारांच्या वक्तव्याचा त्यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. सत्तार यांनी वातावरण बिघडेल अशी वक्तव्य करू नये. डरकाळ्या फोडून ते घाबरवण्याचा प्रयत्न करत असतात. कुत्रा चिन्ह घेतलं तर निवडून येईल हे सत्तारांचे वक्तव्य होते. हा सिल्लोडचा अपमान होता असे दानवे यावेळी म्हणाले. शिवाय कोणताही मतदार संघ कोणाच्या बापाचा नाही अशी शब्दात दानवे यांनी सत्तारांना सुनावले आहे.
ट्रेंडिंग बातमी - शिवसेना विरुद्ध शिवसेना! बाजी कोण मारणार? कदमांचा खळबळजनक दावा
सत्तारांची भाषा ही अहंकाराची भाषा आहे. ते काय औरंगजेब आहेत का असा प्रश्न ही सत्तार यांनी उपस्थित केला. तुम्ही काय औरंगजेब समजून स्वारीवर निघालात का आणि घाबरवताय कोणाला अशी विचारणाही या निमित्ताने केली. सत्तार सिल्लोडमधील सर्व सत्तास्थानं ताब्यात घेण्याच्या विचारात आहे. इतरांना गाडून ते हे काम करायला निघाले आहेत असा आरोपही दानवे यांनी केलाय. त्यांनी मेडिकल कॉलेज काढले. पण ते फक्त अल्पसंख्यांकांसाठी काढले. त्यांनी सर्वांसाठी का काढले नाही असा प्रश्नही या निमित्ताने केला.
ट्रेंडिंग बातमी - मामाची भाच्याला ऑफर, पण नात्या पेक्षा नेत्याला मान, निवडणुकीत असंही घडतय?
दानवे पुढे म्हणाले की सत्तारांनी त्यांची भाषा सुधारली पाहीजे. संयमाने वागले पाहीजे. तुम्ही जनतेचा आदर करा. जर केला नाही तर जनात तुम्हाला तुमची जागा दाखवेल. सध्या दानवे यांच्याकडे भाजपच्या निवडणूक प्रमुख पदाची जबाबदारी आहे. अशा वेळी पक्षाने जर सत्तारांचा प्रचार करण्यासाठी सिल्लोडमध्ये जाण्यास सांगितले तर सत्तारांचा प्रचार करू असे ही दानवे यांनी स्पष्ट केले आहे. असं असंल तरी सत्तारांना कोंडीत पकडण्याची एकही संधी दानवे सोडत नाहीत हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.