महाविकास आघाडीत वाद असलेले 'हे' आहेत 'ते' मतदार संघ

मविआमध्ये जागा वाटपात कळीचा मुद्दा ठरतोय तो विदर्भातल्या जागांचा. विदर्भातल्या काही जागांवर काँग्रेस बरोबर शिवसेनेनेही दावा केला आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
मुंबई:

महाविकास आघाडीत जागा वाटपाची चर्चा सध्या पुढे सरकताना दिसत नाही. काही जागांवर ही चर्चा अडली आहे. काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट विदर्भातील आणि मुंबईतल्या काही जागांवर अडून बसले आहेत. तर काही जागा राष्ट्रवादी शरद पवार गटालाही हव्या आहेत. त्यामुळे जागा वाटपात तिढा निर्माण झाला आहे. ऐवढेच नाही तर आघाडीत बिघाडी होते की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्या जागा कोणत्या आणि त्या जागांसाठी रस्सीखेच का सुरू आहे याची कारणे आता समोर आली आहेत.  

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

विदर्भातल्या कोणत्या जागा कळीच्या? 

मविआमध्ये जागा वाटपात कळीचा मुद्दा ठरतोय तो विदर्भातल्या जागांचा. विदर्भातल्या काही जागांवर काँग्रेस बरोबर शिवसेनेनेही दावा केला आहे. त्यात नागपूर दक्षिण विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे. हा मतदार संघ काँग्रेसच्या गिरीश पांडव यांच्यासाठी हवा आहे. मात्र हा मतदार संघ सोडण्यास शिवसेना ठाकरे गट तयार नाही. दोन्ही पक्षा या जागेवर आडल्याने तिढा निर्माण झाला आहे. त्यात प्रमाणे यवतमाळ विधानसभा मतदार संघ काँग्रेसचा आहे. मात्र त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसला हवा आहे. अकोला पश्चिम मतदार संघावरही शिवसेनेनं दावा केला आहे. मात्र काँग्रेस ही जागा सोडण्यास तयार नाही. शिवसेनेच्या राजेश मिश्रा यांना इथून निवडणूक लढायची आहे.     

ट्रेंडिंग बातमी - उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपात धुसफूस, सांगलीत बंडखोरी होणार?

विदर्भातील आणखी एक जागेवरून वाद सुरू आहे. ती म्हणजे कारंजा विधानसभा मतदार संघ. ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसने मागितली आहे. इथून प्रणित मोरे पाटील हे मैदानात उतरण्याची तयारी करत आहेत. तर जळगाव जामोदवर ही शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर दावा केला आहे. शिवाय दिग्रसचाही वाद सुटलेला नाही. ही जागा काँग्रेसला हवी आहे. काँग्रेसनेते माणिकराव ठाकरे यांच्या मुलाला हा मतदार संघ हवा आहे. तर शिवसेना ठाकरे गटाने पवन जैस्वाल यांना मैदानात उतरवण्याचे ठरवले आहे. 

ट्रेंडिंग बातमी - पहिल्या यादीत नाव का नाही? भाजपचे विद्यमान आमदार थेट बोलून गेले

आर्वी विधानसभा मतदार संघाबाबतही वाद आहेच. या मतदार संघातून काँग्रेसचे अमर काळे निवडणूक लढत होते. मात्र त्यांनी आता राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. शिवाय त्यांना लोकसभेची निवडणूक लढत विजय ही मिळवला आहे. आता काँग्रेसचा या जागेवरली दावा कायम आहे. तर राष्ट्रवादीने ही जागा आपल्याला मिळावी असा आग्रह धरला आहे. अमर काळे यांची पत्नी येथून उमेदवार  असेल असं सांगितलं जात आहे. पण काँग्रेस ही जागा सोडण्यास तयार नाही. काळे यांत्या पत्नीला उमेदवारी देवू असे काँग्रेसने सांगितले आहे. 

Advertisement

मुंबईत ही काही जागांवर तिढा 

कुलाबा मतदार संघ हा काँग्रेसचा राहीला आहे. मात्र ही जागा शिवसेनेला मिळावी असा आग्रह आदित्य ठाकरेंचा आहे. कुलाबा प्रमाणेच भायखळा मतदार संघावर ही शिवसेना ठाकरे गटाने दावा केला आहे. तर काँग्रेसला माजी आमदार मधु चव्हाण यांच्यासाठी ही जागा हवी आहे. तर सेनेकडून किशोरी पेडणेकर यांचे नाव चर्चेत आहे. तिसरा मतदार संघ हा वर्सोवा विधानसभा मतदार संघ आहे. येथे सध्या भाजपकडून भारतीय लवेकर आमदार आहेत. माजी मंत्री सुरेश शेट्टी काँग्रेसकडून या मतदार संघात इच्छुक आहेत. तर ठाकरे गटाकडून  राजुर पटेल यांच्या नावाची चर्चा आहे. 

नक्की वाचा: काँग्रेसच्या पहिल्या यादीचा मुहूर्त ठरला? 'या' दिवशी नावं जाहीर होणार

विदर्भ आणि मुंबईतल्या जागां प्रमाणेच  पारनेर, शिर्डी, दर्यापूर या मतदार संघाबाबतही तोडगा निघालेला नाही. यासर्व जागांवरूनच महाविकास आघाडीत खटके उडत आहेत. तुटे पर्यंच ताणू नका असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. तर काँग्रेसच्या हायकमांडनेही सबुरीने घ्या असा सल्ला दिला आहे. त्यानंतर पुन्हा एकदा या जागांबाबत निर्णय घेतला जाईल, असे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले आहे. 

Advertisement