जाहिरात

पहिल्या यादीत नाव का नाही? भाजपचे विद्यमान आमदार थेट बोलून गेले

भाजपने गडचिरोलीचा उमेदवार अजूनही जाहीर केलेला नाही. इथे विद्यमान आमदार हे डॉ. देवराव होळी हे आहेत.

पहिल्या यादीत नाव का नाही? भाजपचे विद्यमान आमदार थेट बोलून गेले
गडचिरोली:

भारतीय जनता पक्षाने आपली पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत 99 जणांच्या नावाची घोषणा केली आहे. त्यात जवळपास सर्वच विद्यमान आमदारांना संधी देण्यात आली आहे. तर काही आमदार हे आजही वेटींगवर आहेत. त्यामुळे त्यांची धाकधुक वाढली आहे. त्यातून ते आपलं पहिल्या यादीत नाव का नाही याबाबत वक्तव्य करत आहेत. त्यात भाजपने गडचिरोलीचा उमेदवार अजूनही जाहीर केलेला नाही. इथे विद्यमान आमदार हे डॉ. देवराव होळी हे आहेत. त्यांनी पहिल्या यादीत नाव का नव्हतं सांगताना मोठा आरोप केला आहे. त्यामुळे गडचिरोलीत भाजपचे टेन्शन वाढले आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

भाजपने पहिली यादी जाहीर केली. त्यात आरमोरीचे आमदार कृष्णा गजबे यांचा समावेश आहे. मात्र, गडचिरोलीचा उमेदवार अद्याप निश्चित झालेला नाही. त्यामुळे आमदार डॉ. देवराव होळी समर्थकांची धाकधूक वाढली आहे. पक्षाचे टिकीट न मिळाल्यास डॉ. देवराव होळी यांचा काय पावित्र्य असू शकतो याची चर्चा आतापासून सुरू झाली आहे. ते आणि त्यांचे कार्यकर्ते सध्या आक्रमक झाले आहेत.  

ट्रेंडिंग बातमी - उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपात धुसफूस, सांगलीत बंडखोरी होणार?

गेल्या दहा वर्षांमध्ये मतदार संघात केलेली विकास कामे पक्षश्रेष्ठींना सुद्धा माहिती आहेत. जनतेला सुद्धा माहिती आहे. मतदार संघाचा विकास व्हावा यासाठी गेल्या दहा वर्षापासून झटत आहे असा दावा होळी यांनी केला आहे. मात्र आमच्याच पक्षांतर्गत जिल्ह्यातील काही वरिष्ठ नेते पक्षश्रेष्ठींना चुकीची माहिती देत आहेत. असा आरोप होळी यांनी केला आहे. त्यामुळेच आपल्याला उमेदवारी देण्यास वेळ लागत आहे असे ते म्हणाले. 

ट्रेंडिंग बातमी - 'काय गाडी...काय डोंगर...'; पुण्यात 5 कोटींची कॅश जप्त, राऊतांचा शिंदे गटाच्या आमदारावर निशाणा  

असं असलं तरी आपल्या कामाच्या जोरावर आणि जनसंपर्क पाहात आपल्यालाच उमेदवारी मिळे असे होळी यांनी स्पष्ट केले. भाजपची पहिली यादी जाहीर झाली आहे. दुसऱ्या यादीची आपण प्रतिक्षा करणार आहे. या यादीच आपले नाव निश्चित असेल असेही ते म्हणाले. जिल्ह्यातील काही लोकांचा विरोध असला तरी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना आपले काम माहित आहे. त्यामुळे ते उमेदवारी आपल्याच पदरात टाकतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com