जाहिरात

Malegaon Municipal Corporation Election : घरातील सदस्यांना प्राधान्य, मालेगाव महानगरपालिका निवडणुकीत घराणेशाही

यंदाच्या निवडणुकीत एमआयएमने सर्वाधिक ९, इस्लाम पार्टीने ५ काँग्रेस आणि भाजपने प्रत्येकी ३ तर समाजवादी पार्टीच्या नेत्यांनी २ जणांना आपल्या अधिकारात उमेदवारी दिली. 

Malegaon Municipal Corporation Election : घरातील सदस्यांना प्राधान्य, मालेगाव महानगरपालिका निवडणुकीत घराणेशाही

निलेश वाघ, प्रतिनिधी

Malegaon Municipal Corporation Election : मालेगावात महानगरपालिका निवडणुकीतही घराणेशाही पाहायला मिळत आहे. आपल्या घरातील सदस्यांनाच उमेदवारी देण्याकडे  राजकीय पक्षांचा कल दिसत आहे. त्यामुळे सामान्य कार्यकर्त्यांचा हिरमोड झाल्याचे पाहायला मिळत आहे. यंदाच्या निवडणुकीत एमआयएमने सर्वाधिक ९, इस्लाम पार्टीने ५ काँग्रेस आणि भाजपने प्रत्येकी ३ तर समाजवादी पार्टीच्या नेत्यांनी २ जणांना आपल्या अधिकारात उमेदवारी दिली. 

घरातच उमेदवारीचं वाटप...

दुसरीकडे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी मात्र घराणेशाहीला फाटा दिला. शिवसेनेकडे घराणेशाही पहायला मिळत नाही. घराणेशाहीमध्ये सर्वात पुढे एमआयएम असल्याचे समोर आले आहे. पक्षाचे शहराध्यक्ष परवेज खालिद यांच्यासह त्यांचे दोन भाऊ, चुलत भाऊ, दोन भावजया, सून, बहीण यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आणखी एक बहीण अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात आहे. 

त्या खालोखाल इस्लाम पार्टीने घरातील पाच जणांना उमेदवारी दिली आहे.पक्षाचे प्रमुख असलेल्या माजी आमदार आसिफ शेख यांनी त्यांची आई, दोन भाऊ, चुलते आणि भावजय यांना उमेदवारी दिली आहे. भाजपचे सुनील गायकवाड स्वतः तसेच भाऊ व मुलगाही रिंगणात आहे.काँग्रेस एजाज बेग यांच्यासह त्यांची पत्नी आणि भाऊ उमेदवारी करीत आहे. तर समाजवादी पार्टीचे मुस्तकीम डिग्नेटी व त्यांच्या पत्नी शान हिंद उमेदवारीच्या आखाड्यात उतरल्या आहे.

Maharashtra Election 2026 : कुठे भाजप-राष्ट्रवादी युती तर कुठे भाजप स्वतंत्र; कोणता पक्ष कुठे आणि कोणासोबत लढणार? 

नक्की वाचा - Maharashtra Election 2026 : कुठे भाजप-राष्ट्रवादी युती तर कुठे भाजप स्वतंत्र; कोणता पक्ष कुठे आणि कोणासोबत लढणार? 

सभागृहातील हक्काची मतं राखण्यासाठी घरातच उमेदवारी

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक ही कार्यकर्त्यांची असते. मात्र कार्यकर्त्यांना डावलून घरातील आई, मुलगा,भाऊ, बहीण, भावजय अशांना उमेदवारी दिल्याने कार्यकर्त्यांचा  हिरमोड झाल्याचे दिसत आहे. तब्बल आठ वर्षानंतर मालेगाव महापालिका निवडणूक घोषित झाली आहे. मागील दोन पंचवार्षिक नंतर सभागृहात एकूण चार वेळा महापौर पदासह सत्तेसाठी स्पर्धा झाली आहे. यावेळी एका -एका नगरसेवकाचे महत्त्व राजकीय सत्ताधाऱ्यांना लक्षात आले. त्यामुळे भविष्यात सभागृहात आपलीच हक्काची मते राखण्यासाठी सध्याच्या निवडणुकीत उमेदवारी हातच्या राखून दिल्या गेल्या आहेत. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com