जाहिरात
This Article is From Nov 04, 2024

बड्या नेत्यांचे 'मिशन विदर्भ'! मोदी, गांधी, ठाकरे, पवार घेणार सभा; कोण कधी मैदान गाजवणार?

बड्या नेत्यांचे 'मिशन विदर्भ'! मोदी, गांधी, ठाकरे, पवार घेणार सभा; कोण कधी मैदान गाजवणार?
नागपूर:

विधानसभा निवडणुकीला जोर चढत असताना, सगळ्याच पक्षाच्या बड्या राजकीय नेत्यांनी मिशन विदर्भ राबविण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसचे नेते राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) शरद पवार, मनसेचे राज ठाकरे विदर्भात येत आहेत.

भाजप आणि काँग्रेस या दोन्ही मोठ्या पक्षांनी यावेळी विदर्भाला विशेष महत्त्व दिले आहे. विदर्भात जो पक्ष बाजी मारेल, त्याला सत्तेचे दरवाजे सहज उघडतील असा अंदाज आहे. त्यामुळे सगळ्यांनीच विदर्भाला फोकस केलं आहे. महायुती आणि महाविकास आघाडीच्या विरोधात उमेदवार उभे करणारे नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे येत्या 5 नोव्हेंबर रोजी वणी येथून प्रचाराचे रणशिंग फुंकणार आहेत. काँग्रेसचे नेते राहुल गांधी तर काँग्रेसच्या प्रचाराचा बिगुल नागपुरातून फुंकणार आहेत. 6 नोव्हेंबर रोजी रेशीमबागेतील सुरेश भट सभागृहात ते संविधान संमेलन घेणार आहेत. याच सभेतून ते प्रचाराचे रणशिंग ते फुंकतील.

कोल्हापूर काँग्रेसमध्ये मोठी कोलाहल; मधुरिमा राजे यांची माघार, सतेज पाटील यांचा संताप

नक्की वाचा - कोल्हापूर काँग्रेसमध्ये मोठी कोलाहल; मधुरिमा राजे यांची माघार, सतेज पाटील यांचा संताप

7 आणि 8 तारखेला शिवसेनेचे (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे विदर्भात आहेत. 7 रोजी ते दर्यापूर, तिवसा, बडनेरा, बाळापूर येथे तर 8 रोजी बुलडाणा आणि मेहकर येथे सभा घेणार आहेत. 7 आणि 8 नोव्हेंबरला शरद पवार विदर्भात आहेत. 7 नोव्हेंबर रोजी सकाळी शरद पवार सकाळी 11 वाजता पूर्व नागपूर येथे प्रचारसभा घेतील. तिरोडा येथे दुपारी 2.30 वाजता तर काटोल येथे सायंकाळी 5 वाजता सभा घेणार आहेत. 8 नोव्हेंबर रोजी सकाळी हिंगणघाट येथे सभा घेऊन ते मराठवाड्यात जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अलीकडेच पोहरादेवी येथे येऊन गेले. ते पुन्हा 9 नोव्हेंबर रोजी विदर्भात येत आहेत. चिमूर मतदारसंघात त्यांची सभा होणार आहे. त्यानंतर ते अकोला येथेही येणार आहेत. त्यांचा दौरा दोन दिवसांत अंतिम होणार असल्याचे भाजपच्यावतीने सांगण्यात येत आहे.

अशा होणार सभा
5 नोव्हेंबर : राज ठाकरे : वणी
6 नोव्हेंबर : राहुल गांधी : नागपूर
7 नोव्हेंबर : उद्धव ठाकरे : दर्यापूर, बडनेरा, तिवसा
7 नोव्हेंबर : एकनाथ शिंदे : दर्यापूर, रामटेक, भंडारा
7 नोव्हेंबर : शरद पवार : नागपूर, तिरोडा, काटोल
8 नोव्हेंबर : उद्धव ठाकरे : बुलडाणा, मेहकर
8 नोव्हेंबर : शरद पवार : हिंगणघाट
9 नोव्हेंबर : नरेंद्र मोदी : चिमूर

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com