जाहिरात

वायकरांच्या नातेवाईने कुणाला कॉल केले? वायव्य मुंबईच्या निकालावर ठाकरे गटाचा मोठा दावा

Mumbai North West Lok Sabha Result मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील निवडणूक निकालाचा वाद आणखी वाढला आहे.

वायकरांच्या नातेवाईने कुणाला कॉल केले? वायव्य मुंबईच्या निकालावर ठाकरे गटाचा मोठा दावा
मुंबई:

मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील निवडणूक निकालाचा वाद आणखी वाढला आहे. शेवटच्या फेरीपर्यंत अटीतटीनं लढलेल्या या निवडणुकीत शिवसेनेच्या रविंद्र वायकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अमोल कीर्तिकर यांचा फक्त 48 मतांनी पराभव केला. उद्धव ठाकरे गटाकडून या निकालावर आक्षेप घेण्यात आले असून त्यांनी या प्रकरणात कोर्टात जाण्याची घोषणा केली आहे. त्याचबरोबर रविंद्र वायकर यांच्या नातेवाईकांनी कुणाला फोन केले ? हे माहिती असल्याचा दावा देखील पक्षानं केला आहे. 19 व्या फेरीपर्यंत सर्व कळत होतं. त्यानंतरची प्रक्रिया संशायस्पद असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय आहेत आक्षेप?

मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा निवडणुकीच्या निकालावर आक्षेप घेणारी पत्रकार परिषद मुंबईतील शिवसेना भवनमध्ये (सोमवारी) झाली. ही सीट आम्ही जिंकलो होतो आमची हक्काची ही सीट होती, असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला.  उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील निवडणूक ही पारदर्शक पद्धतीने झाली नाही. भाजपच्या हातात यंत्रणा आहे पारदर्शक पद्धतीने निवडणूक झाली असती तर त्यांना 40 जागा ही मिळाल्या नसत्या.आमची कायदेशीर लढाई सुरु राहणार आणि आम्ही हा विजय मिळवणार असं ठाकरे यांनी सांगितलं.

आदित्य ठाकरेंपाठोपाठ अनिल परब यांनी देखील या मतमोजणीवर आक्षेप करणारे मुद्दे मांडले. निवडणूक अधिकारी आणि आमच्या टेबलवर अंतर होतं. 17 सी फॉर्ममध्ये किती मतदान झालं हे लिहिलेलं असतं. त्यावर सगळ्यांच्या सह्या घेतल्या जातात. या लोकसभा निवडणुकीत अर्ध्या लोकांना हे फॉर्म दिले बऱ्याच लोकांना दिलीच नाहीत. त्यामुळे आमची मतं आणि त्यांची मतं यामध्ये 650 चा फरक जाणवला आहे, असा दावा परब यांनी केला.

( नक्की वाचा : 'गरज सरो, वैद्य मरो!' प्रकाश आंबेडकर उद्धव ठाकरेंवर का भडकले? )
 

कुणाचे कॉल आले?

आम्हाला CCTV फुटेज देऊ असं आश्वासन उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिलं होतं. मात्र त्यांनी हे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार दिला. पारदर्शकता आहे तर तुम्ही सीसीटीव्ही फुटेज का देत नाही? असा सवाल यावेळी परब यांनी विचारला. आमचा झालेला विजय सरकारी यंत्रणेचा गैरवापर करून हिसकावून घेण्यात आला आहे. निवडणूक अधिकाऱ्यांचा इतिहस काय आहे? त्यांच्यावर आरोप काय झाले आहेत? निकाल एकतर्फी जाहीर केला गेला. निवडणूक अधिकाऱ्यांना कुणाचे फोन येत होते? त्या वारंवार बाथरूमला जावून कुणाशी बोलत होत्या. हे तपासण्याची आवश्यकता आहे, असं त्यांनी सांगितलं.

( नक्की वाचा : 'त्यांचा खरा चेहरा वेगळा...तोडपाणी, वसुलीत...' रवी राणांचे बच्चू कडूंवर गंभीर आरोप )
 

वायकरांच्या नातेवाईकाने कुणाला कॉल केले याची माहिती आहे 13 जूनला गुन्हा दाखल केला. मधल्या काळात फोनही बदलले असतील. निवडणूक अधिकारी आणि पोलीस एकमेंकावर जबाबदारी ढकलत आहेत, निवडणूक आयोगानं त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी परब यांनी केली.  

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Previous Article
लोकसभा पराभवानंतर भाजपचा अ‍ॅक्शन प्लान तयार, 'या' नेत्यांवर मोठी जबाबदारी
वायकरांच्या नातेवाईने कुणाला कॉल केले? वायव्य मुंबईच्या निकालावर ठाकरे गटाचा मोठा दावा
rahul-gandhi-will-remain-mp-from-rae-bareli-priyanka-gandhi-will-contest-from-wayanad
Next Article
रायबरेली की वायनाड? राहुल गांधींचं ठरलं, प्रियांका गांधी लढवणार निवडणूक