सध्या निवडणुकीचा माहोल आहे. दिवाळी असली तरी सर्वत्र शाब्दीक फटाके फोडले जात आहे. त्यात दिवाळी कुठे तरी हरवली आहे की काय? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केला आहे. लहानपणी दिवाळीचा जो आनंद होता तो आता राहीला नाही याची खंतही छगन भुजबळ यांनी व्यक्त केली आहे. NDTV मराठी बरोबर बोलतना त्यांनी आपल्या लहानपणीच्या दिवाळीच्या आठवणी आवर्जून सांगितल्या. शिवाय त्यावेळीची दिवाळी आणि आताची दिवाळी यात फरक काय झाला आहे हे ही सांगितले. शिवाय यावर्षीची दिवाळी कशी वेगळी आहे हे सांगायलाही ते विसरले नाहीत.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
लहानपणी दिवाळी जवळ आली की सुट्टी कधी लागणार याचे वेध लागायचे. गोडधोड खायला मिळणार याचा मनात आनंद असायचा. मुंबईत ज्या चाळीत आम्ही राहात होतो तिथे दिवाळीची लगबग दिसायची असे छगन भुजबळ यांनी सांगितले. चाळीत एकमेकाला फराळ करण्यासाठी मदत केली जायची. सर्व फराळ हा घरीच बनवला जायचा. तो बनवला गेल्यानंतर ती दिवाळी चाळीतल्या प्रत्येक घरात जायची. प्रत्येक जण फराळाचे वाटप करायचा. तो क्षण आमच्यासाठी आनंदाचा असायचा. दिवाळी म्हटली म्हणजे सामुहीक आनंद अशी स्थिती होती असे भुजबळ सांगता.
ट्रेंडिंग बातमी - 'देवेंद्र तात्यांनीच मला सर्व शिकवलं' जरांगेंनी पुन्हा फडणवीसांना डिवचलं
फटाक्यांबाबतही आम्हाला उत्सुकता असायची. लवंगी फटाके त्यावेळी फेमस होते. त्याची माळ लावली की ते सर्व फुटत नव्हते. मग उरलेले फटाके आम्ही जामा करायचो. त्याच्या वाती काढायतो. त्यातले एक एक फटाकेनंतर फोडायचो अशा आठवणीही भुजबळांनी सांगितल्या. फुलबाज्या, बॉम्ब, पाऊस ते नागगोळ्यापर्यंतचे फटाके चाळीत वाजवले जायचे. एकमेकांच्या आनंदात त्यावेळी सर्व जण सहभागी होत होते. एकमेकांना शुभेच्छा दिल्या जात होत्या. एकमेकांना भेटले जात होते. दिवाळीचे स्वरूप हे सार्वजनिक होते असेही ते म्हणाले.
ट्रेंडिंग बातमी - काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का, विद्यमान आमदाराचा शिंदे गटात प्रवेश
मात्र आताची स्थिती पुर्ण पणे बदलली आहे. दिवाळी आहे का असा प्रश्न आता पडतो. फरात कोणीही घरी बनवत नाही. आता ऑर्डर दिली जाते. त्यानंतर तयार फराळ घरी येतो. दिवाळी ही आता स्वत:च्या घरापुरता मर्यादीत झाली आहे. चाळी तुटल्या. इमारती आल्या. आता इमारतीच्या फ्लॅटमध्येच दिवाळी साजरी होते. ती बाहेर काही येत नाही याची खंत भुजबळांनी बोलून दाखवली. शुभेच्छा तर मोबाईलवरून दिल्या जातात. कोणी कोणाला भेटत नाहीत. पहिले जे स्वरूप दिवाळीचे होते ते पुर्ण पणे बदलले आहे. फटाकेही आता आकाशात दिसतात. जमीनीवरची दिवाळी दिसत नाही. पहिले दिवाशी अंकही येत होते. आता ते दिसत नाहीत.
ट्रेंडिंग बातमी - बंडखोराची समजूत काढायला अजितदादा थेट बंगल्यावर गेले, बंडखोराने शेवटी काय केले?
तुळशीच्या लग्नापर्यंत पहिले दिवाळी चालायची. आता तसे होताना दिसत नाही. निवडणुका असल्याने यावेळची दिवाळी तर फार वेगळी आहे असे भुजबळ म्हणाले. एकमेकांवर शाब्दीक फटाके उडवण्यात सध्याची दिवाळी जात आहे. पहिले दिवाळीचे पाच दिवस घरी बसायचो. पण निवडणुका असल्याने आमच्या घरातले सर्व जण तर प्रचारात गुंतले आहेत. त्यामुळे दिवाळी वाटतच नाही. आता 18 तारखेपर्यंत वेगवेगळे फटाके फुटताना तुम्हाला दिसणार आहेत. मग त्यात ठाकरे फटाके, शिंदे फटाके, पवार फटाके, मनसे, बीजेपी, काँग्रेस फटाके आलेच. काही आपटबारही दिसून येतील असे भुजबळ मिश्किल पणे म्हणाले. यातून महाराष्ट्रातल्या जनतेचे मात्र मनोरंजन होणार आहे असंही त्यांनी सांगितले.
ट्रेंडिंग बातमी - मराठा- मुस्लिम -दलित एकत्र, जरांगेंचा पुढचा प्लॅन ठरला! 3 नोव्हेंबरला मोठी घोषणा
मात्र पाच तारखेनंतर जे फटाके फुटणार आहेत त्याचा दणका फार मोठा असेल असे भुजबळ म्हणाले. मात्र काही झाले तरी 23 तारखेला महायुतीच फटाके उडवेल असा विश्वास त्यांनी या निमित्ताने व्यक्त केला. या निवडणुकीत जवळपास 25 ते 30 अपक्ष निवडून येतील असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. सध्या अनेक जण इच्छुक आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली आहे. त्यातले अनेक जण निवडून ही येवू शकतात असेही ते म्हणाले. सध्या कोण कोणत्या पक्षात आहे हे समजायला मार्ग नाही असेही ते म्हणाले. दरम्यान समीर भुजबळांची दिवाळी पण गोड होणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.