सुप्रिया सुळेंच्या कार्यकर्त्यांनी उधळला विजयाचा गुलाल, निवडणुकीच्या निकालाआधीच सेलिब्रेशन

महाविकास आघाडीच्या बारामती लोकसभेच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना निकालाआधीच कार्यकर्त्यांनी विजयी गुलाल लावला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

प्रतीक्षा पारखी, बारामती

बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या निकालाकडे अवघ्या देशाचं लक्ष आहे. पवार कुटुंबीय पहिल्यांदाच निवडणुकीत आमने-सामने आले आहेत. बारामतीत ताई की वहिनी असा प्रश्न मतदारांना पडला आहे. मतदार पहिल्यांदाच मतदान करताना द्विधा मन:स्थितीत दिसले. मात्र निवडणुकीच्या निकालाआधीच सुप्रिया सुळे यांनी विजयाचा गुलाल उधळला आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

बारामतीत आरोप-प्रत्यारोप

महाविकास आघाडीच्या बारामती लोकसभेच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना निकालाआधीच कार्यकर्त्यांनी विजयी गुलाल लावला आहे. मतदानाच्या शेवटच्या दिवसापर्यंत अनेक नाट्यमय घडामोडी बारामाती मतदारसंघात घडल्या. एकीकडे अजित पवार गटावर आरोप करत बारामतीत पैशांचा पाऊस पाडल्याचा आरोप शरद पवार गटाकडून करण्यात आला. तर काही ठिकाणी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाल्याचं पाहायला मिळालं. 

(हेही वाचा - मतदान केलं अन् मिळाली हिऱ्याची अंगठी, नेमकं काय घडलं?)

वारजे भागात निकालाआधीच जल्लोष

दरम्यान निवडणूक पार पडल्यानंतर निकालाआधीच कार्यकर्त्यांनी सुप्रिया सुळे यांना गुलाल लावल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे पुण्यातील वारजे भागात आल्या होत्या. याठिकाणी खासदार सुप्रिया सुळे यांना कार्यकर्त्यांनी विजयी गुलाल लावला.

(हेही वाचा - माजी नगरसेवकांच्या तिरंगी लढतीमध्ये पुण्याचा कारभारी कोण होणार?  )

वारजे भागात सुप्रिया सुळे यांचं फटाके वाजवून आणि गुलाल लावून स्वागत करण्यात आलं. नगरसेवक सचिन दोडके यांच्याकडून हे स्वागत करण्यात आलं.  सुप्रिया सुळे पुन्हा निवडून येणार असल्याचा भावना यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. सुप्रिया सुळे यांनीही कार्यकर्त्यांचा मान राखत हे स्वागत आनंदाने स्वीकारलं. मात्र निवडणुकीत बाजी कोण मारणार, सुप्रिया सुळे की सुनेत्रा पवार? हे 4 जून निकालात कळेल. 

Advertisement
Topics mentioned in this article