जाहिरात

पिंपरी-चिंचवडमध्ये 'घराणेशाही'चा डंका; दिग्गज नेत्यांच्या सुपुत्रांची महापालिकेत दिमाखात एन्ट्री!

या निकालांमुळे पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात आता नवीन तरुण चेहऱ्यांचा प्रभाव वाढणार असून दिग्गज नेत्यांनी आपली प्रतिष्ठा जपण्यात यश मिळवल्याचे दिसून येत आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये 'घराणेशाही'चा डंका; दिग्गज नेत्यांच्या सुपुत्रांची महापालिकेत दिमाखात एन्ट्री!

सूरज कसबे, प्रतिनिधी 

Pimpri-Chinchwad Municipal Corporation Election Results 2026 :  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीत यंदा राजकीय वारसा आणि घराणेशाहीचा मोठा प्रभाव पाहायला मिळाला. शहरातील प्रस्थापित नेत्यांच्या पुढच्या पिढीने निवडणुकीच्या मैदानात उतरून आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. यामध्ये विधानसभेचे उपाध्यक्ष, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत महापालिकेत एन्ट्री केली आहे.

वडिलांच्या पावलावर पाऊल

सिद्धार्थ बनसोडे आणि विश्वजीत बारणे यांचा विजय
विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे पुत्र सिद्धार्थ बनसोडे यांनी प्रभाग क्रमांक ९ मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर विजय मिळवला. त्यांनी भाजपच्या कमलेश वाळके यांचा पराभव केला. वडिलांनी केलेली विकासकामे आणि त्यांच्याकडून मिळालेली प्रेरणा यामुळेच मी हा विजय मिळवू शकलो,अशी भावना सिद्धार्थ बनसोडे यांनी व्यक्त केली. दुसरीकडे, मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांचे पुत्र विश्वजीत बारणे यांनी प्रभाग क्रमांक २४ मधून शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवत भाजपच्या सिद्धेश्वर बारणे यांचा पराभव केला. पहिल्याच निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर, वडिलांचा राजकीय वारसा सक्षमपणे पुढे चालवणार असल्याचा निर्धार विश्वजीत बारणे यांनी व्यक्त केला.

Latest and Breaking News on NDTV

प्रभाग १० मध्ये भाजपचा करिष्मा

अनुराधा गोरखे आणि कुशाग्र कदम विजयी प्रभाग क्रमांक १० मध्ये भाजपने आपले वर्चस्व कायम राखले आहे. विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांच्या मातोश्री अनुराधा गोरखे या दुसऱ्यांदा नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. त्यांनी राष्ट्रवादीच्या डॉ. नीलिमा पवार यांचा पराभव केला. त्याचप्रमाणे, राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी महापौर मंगला कदम यांचे पुत्र कुशाग्र कदम यांनी यंदा भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवली होती. त्यांनी राष्ट्रवादीच्या संदीप चव्हाण यांचा पराभव करत पहिल्याच प्रयत्नात नगरसेवक होण्याचा मान मिळवला आहे.

Latest and Breaking News on NDTV

वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी यश साने मैदानात

प्रभाग क्रमांक १ मध्ये राष्ट्रवादीचे दिवंगत माजी विरोधी पक्षनेते दत्ता काका साने यांचे पुत्र यश साने यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. त्यांनी भाजपचे गणेश मळेकर यांचा पराभव केला. कोरोना काळात वडिलांचे निधन झाले, त्यांचे जनसेवेचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी राजकारणात आलो आहे, असे भावुक उद्गार यश साने यांनी विजयानंतर काढले.

Latest and Breaking News on NDTV

कोणाशी होती लढत ?

प्रभाग क्र. १

विजयी उमेदवार: यश साने (राष्ट्रवादी) – २४,२८४ मते
पराभूत उमेदवार: गणेश मळेकर (भाजप)

प्रभाग क्र. ९

विजयी उमेदवार: सिद्धार्थ बनसोडे (राष्ट्रवादी) – १५,४७८ मते
पराभूत उमेदवार: कमलेश वाळके (भाजप)

प्रभाग क्र. १०

विजयी उमेदवार: अनुराधा गोरखे (भाजप) – १२,९३९ मते
पराभूत उमेदवार: डॉ. नीलिमा पवार (राष्ट्रवादी)

प्रभाग क्र. १०

विजयी उमेदवार: कुशाग्र कदम (भाजप) – १२,२८८ मते
पराभूत उमेदवार: संदीप चव्हाण (राष्ट्रवादी)

प्रभाग क्र. २४

विजयी उमेदवार: विश्वजीत बारणे (शिवसेना) – १३,८७९ मते
पराभूत उमेदवार: सिद्धेश्वर बारणे (भाजप)

या निकालांमुळे पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात आता नवीन तरुण चेहऱ्यांचा प्रभाव वाढणार असून दिग्गज नेत्यांनी आपली प्रतिष्ठा जपण्यात यश मिळवल्याचे दिसून येत आहे.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com