'सत्तेत आले तर हे तुमचं घर, गाडी, सोनं जप्त करुन वाटून टाकतील'; PM मोदींचा काँग्रेसवर निशाणा

इंडिया आघाडीच्या नेत्यांनी आपला पराभव स्वीकारला आहे. त्यांनी सर्व अपेक्षा देखीदल सोडल्या आहेत, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
नवी दिल्ली:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर निशाणा साधला आहे. विरोधी पक्षांची भारतीयांच्या संपत्तीवर नजर आहे. भारतीयांची संपत्ती ते लुटण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे तुमचं घर, गाड्या आणि सोनं ते जप्त करुन वाटून टाकतील, असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं. ते उत्तर प्रदेशच्या अलीगड येथील प्रचारसभेत बोलत होते. 

नक्की वाचा - भाजपने निवडणुकीपूर्वीच खातं उघडलं; गुजरातमध्ये बिनविरोध पहिला खासदार

इंडिया आघाडीच्या नेत्यांनी आपला पराभव स्वीकारला आहे. त्यांनी सर्व अपेक्षा देखीदल सोडल्या आहेत. विरोधक सातत्याने विचारणा करतात की मोदी विकासित भारताच्या गोष्टी करतात. भारताला जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनवण्याचा प्रयत्न का करत आहेत? या लोकांना (विरोधक) आपली घरे आणि सत्तेपुढे काहीच दिसत नाही , अशा शब्दात पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर निशाणा साधला. 

नरेंद्र मोदींनी पुढे म्हटलं की, मी काँग्रेसचा जाहीरनामा पाहून देशवासियांना सावध करतोय. काँग्रेस आणि इंडिया आघाडीची नजर तुमच्या संपत्तीवर आहे. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांचा युवराज असा उल्लेख करत त्यांनी म्हटलं की, त्यांचं सरकार बनलं तर ते कुणाकडे किती संपत्ती आहे, कोणाची किती कमाई आहे आणि कुणाची किती घरं आहेत, याची चौकशी करतील. त्यांचं सरकार आले तर ते यावर नियंत्रण देखील आणतील, असंही नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.

नक्की वाचा-  'फडणवीसांना अटकेची भीती तर शिंदेंना...' राऊतांचा 'त्या' आरोपावर मोठा गौप्यस्फोट

अनेकांनी आपल्या मुलांच्या भविष्यासाठी गुंतवणूक केली असेल. हे लोक त्याची देखील चौकशी करतील. त्यानंतर ते या सर्व संपत्तीची जप्ती करतील. तुमची ही संपत्ती तुमच्याकडून घेऊन वाटली जाईल. तुमच्या गावातील वडिलोपार्जित संपत्तीवर देखील जप्ती येऊ शकते, असं मोदींनी म्हटलं. 

Advertisement

काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार

काँग्रेस नेते अभिषेक मनू सिंगवी यांच्यासह काँग्रेसच्या शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या वक्तव्याची निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. एकूण १७ तक्रारी करण्यात आल्या आहेत. काँग्रेसचे महासचिव केसी वेणुगोपाल यांनी म्हटलं की, काँग्रेसच्या जाहीरनाम्याची प्रत नरेंद्र मोदींना पाठवली जाईल. याशिवाय एक लाख नागरिकांच्या सह्या करुन एक याचिका देखील दाखल केली जाणार आहे. 

Advertisement