PM Narendra Modi Exclusive Interview : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी NDTV नेटवर्कचे मुख्य संपादक संजय पुगलिया यांना दिलेल्या विषेश मुलाखतीत केंद्रीय मंत्रिमंडळाच्या कामकाजाच्या पद्धतीची माहिती दिली. मंत्रिमंडळाने कामाची एक नवीन परंपरा सुरु केली आहे. ज्यामुळे देशाला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचण्यास मदत होणार आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
एनडीटीव्हीला दिलेल्या या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकल ते ग्लोबल सर्व मुद्द्यांवर सविस्तर आपलं मत मांडलं. तसेच आपल्या सरकारची कार्यशैली मागील सरकारांपेक्षा कशी वेगळी आहे, यावर देखील ते सविस्तर बोलले.
नक्की वाचा : Exclusive : 'आमचं पारडं जड', 2024 च्या निवडणूक निकालाबाबत PM मोदींची NDTV ला खास मुलाखत
PM Modi on NDTV | कॅबिनेट नोटबाबत काय असतो पंतप्रधान मोदींचा आग्रह?
— NDTV Marathi (@NDTVMarathi) May 19, 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची NDTV नेटवर्कचे मुख्य संपादक संजय पुगलिया यांनी घेतलेली सर्वात 'प्रभावी' मुलाखत. प्रसिद्ध होत आहे रविवार 📅 19 मे 📷रात्री 8 वाजता 📷#PMModiOnNDTV@narendramodi@PMOIndia… pic.twitter.com/XmMWLbLKi0
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की, आजकाल मंत्रिमंडळात एका महत्त्वाची परंपरा सुरु झाली आहे. संसदेत एखादं विधेयक आलं की त्यासोबत एक ग्लोबल नोट देखील येते. यामध्ये जगभरातील कोणता देश त्या क्षेत्रात चांगली कामगिरी करत आहे, त्यांचे कायदे-नियम काय आहेत हे तपासले जातात. तिथे आम्हाला पोहोचण्यासाठी काय करावं लागेल, यासाठी प्रयत्न केले जातात.
म्हणजेच आमच्या मंत्रिमंडळाची प्रत्येक कॅबिनेट नोट ग्लोबल स्टॅण्डर्डला मॅच करणारी असते. त्यामुळे अधिकाऱ्यांना देखील सवय झाली आहे की फक्त बोलून चालणार नाही. जगभरात काय उत्तम आहे आणि आपण त्यापासून किती दूर आहोत, तिथपर्यंत पोहोचण्याचा मार्ग काय आहे, हे सर्व सांगवं लागतं, असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं.
नक्की वाचा Super Exclusive: NDTV च्या खास मुलाखतीत पंतप्रधान मोदींनी दिला यशाचा 'फोर-एस' मंत्र
भाजप मोठा विजय नोंदवणार : PM मोदी
लोकसभा निवडणुकीत भाजप विजयाचे मोठे विक्रम करणार आहे. देशातल्या जनतेला सरकारवर विश्वास आहे. जनतेला एका गोष्टीची जाणीव आहे की एक असे सरकार आहे ज्याला आमच्या दु:ख आणि अडचणींची काळजी आहे. शिवाय जनतेची स्वप्न काय आहेत याचाही अंदाज या सरकारला आहे, अशी भावना जनतेची आहे. त्यामुळेच या निवडणुकीत भाजप मोठा विजय नोंदवणार आहे, असा विश्वास देखील नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world