जाहिरात

पुणे जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदार संघात 506 टेबलावर मतमोजणी

पुणे जिल्ह्यात मतदारसंघनिहाय ईव्हीएम मतमोजणीसाठी 391 आणि टपाली तसेच ईटीपीबीएस मतमोजणीसह एकूण 506 टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे.

पुणे जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदार संघात 506 टेबलावर मतमोजणी
पुणे:

विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबरला होत आहे. पुणे जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदार संघातील मतमोजणीसाठी तयारी पूर्ण झाली आहे. मतदारसंघनिहाय ईव्हीएम मतमोजणीसाठी 391 आणि टपाली तसेच ईटीपीबीएस   मतमोजणीसह एकूण 506 टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली आहे. जिल्ह्यात मतमोजणीच्या सर्वाधिक 30  इतक्या फेऱ्या पुरंदर विधानसभा मतदार संघात होणार आहेत. तर बारामती मतदार संघात सर्वाधिक 30 टेबल ठेवण्यात येणार आहेत. 21 मतदार संघात होणाऱ्या मतमोजणीसाठी टेबल आणि फेऱ्यांची माहिती पुढील प्रमाणे आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

जिल्ह्यातील सर्व मतदार संघात मिळून ईव्हीएम मतमोजणीसाठी 391, टपाली मतमोजणीसाठी 87 तर ईटीपीबीएससाठी 28 टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. जुन्नर व आंबेगाव मतदार संघात ईव्हीएम मतमोजणीसाठी प्रत्येकी 18 टेबल, टपाली मतपत्रिकांसाठी 6 तर ईटीपीबीएस मतमोजणीसाठी अनुक्रमे 1 व 2 टेबल ठेवण्यात येणार आहेत. 20 फेऱ्या होणार आहेत. खेड आळंदी- ईव्हीएम मतमोजणीसाठी 20, टपाली- 4, ईटीपीबीएस- 2 टेबल- एकूण 20 फेऱ्या होणार आहेत.   शिरुर- ईव्हीएम मतमोजणीसाठी 24, टपाली- 4, ईटीपीबीएस- 2 टेबल असतील तर 24 फेऱ्या होणार आहेत.  दौंड- ईव्हीएम मतमोजणीसाठी 14, टपाली- 5, ईटीपीबीएस- 1 टेबल असेल. या मतदार संघात 23 फेऱ्या होतील. इंदापूर- ईव्हीएम मतमोजणीसाठी 14, टपाली- 6, ईटीपीबीएस- 1 टेबल आणि 24 फेऱ्या अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

ट्रेंडिंग बातमी - महायुती की महाविकास आघाडी? निकालाच्या एकदिवस आधी प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केली भूमिका

बारामती मतदार संघात ईव्हीएम मतमोजणीसाठी 20, टपाली- 8, ईटीपीबीएस- 2 टेबल- 20 फेऱ्या, पुरंदर- ईव्हीएम मतमोजणीसाठी 14, टपाली- 6, ईटीपीबीएस- 2 टेबल- 30 फेऱ्या, भोर- ईव्हीएम मतमोजणीसाठी 24, टपाली- 3, ईटीपीबीएस- 3 टेबल- 24 फेऱ्या, मावळ- ईव्हीएम मतमोजणीसाठी 14, टपाली- 2, ईटीपीबीएस- 1 टेबल- 29 फेऱ्या, चिंचवड- ईव्हीएम मतमोजणीसाठी २24, टपाली- 4, ईटीपीबीएस- 1 टेबल- 24 फेऱ्या, पिंपरी- ईव्हीएम मतमोजणीसाठी 20, टपाली- 3, ईटीपीबीएससाठी 1 टेबल ठेवण्यात येणार असून 20 फेऱ्या होणार आहेत. 

ट्रेंडिंग बातमी - 'सगळ्यांना माझी गरज लागते,पण...' विरारमधील राड्यानंतर हितेंद्र ठाकूर कोणा बरोबर?

भोसरी मतदार संघात ईव्हीएम मतमोजणीसाठी 22, टपाली- 4, ईटीपीबीएस- 1 टेबल- 23 फेऱ्या, वडगाव शेरी- ईव्हीएम मतमोजणीसाठी 20, टपाली- 3, ईटीपीबीएस - 1 टेबल- 22 फेऱ्या, शिवाजीनगर- ईव्हीएम मतमोजणीसाठी 14, टपाली- 3, ईटीपीबीएस- 1 टेबल- 20 फेऱ्या, कोथरुड- ईव्हीएम मतमोजणीसाठी 20, टपाली- 4, ईटीपीबीएस- 1 टेबल- 20 फेऱ्या, खडकवासला- ईव्हीएम मतमोजणीसाठी 21, टपाली- 4, ईटीपीबीएससाठी 1 टेबल ठेवण्यात आले असून मतमोजणीच्या 25 फेऱ्या होणार आहेत.

ट्रेंडिंग बातमी - महायुती की महाविकास आघाडी? निकालाच्या एकदिवस आधी प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केली भूमिका

पर्वती मतदार संघात ईव्हीएम मतमोजणीसाठी 18, टपाली- 2, ईटीपीबीएस- 1 टेबल- 20 फेऱ्या, हडपसर- ईव्हीएम मतमोजणीसाठी 24, टपाली- 4, ईटीपीबीएस- 1 टेबल- 23 फेऱ्या, पुणे कॅन्टोन्मेंट- ईव्हीएम मतमोजणीसाठी 14, टपाली- 3, ईटीपीबीएस- 1 टेबल- 20 फेऱ्या, कसबापेठ- ईव्हीएम मतमोजणीसाठी 14, टपाली- 3, ईटीपीबीएससाठी 1 टेबल ठेवण्यात येणार असून 20 फेऱ्या याप्रमाणे मतमोजणी होणार आहे.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com