PMC Election Result 2026 Live Update : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या पुणे महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टी दणदणीत आघाडीवर आहे. पुण्यात भाजपानं पुन्हा एकदा आपली पकड मजबूत केली आहे. पुणे महानगरपालिकेची सत्ता मिळवण्यासाठी अजित पवारांनी सर्व शक्ती पणाला लावली होती. त्यांनी काका शरद पवार यांच्याशी असलेले मतभेद बाजूला सारले. पण, त्यानंतरही त्यांचा मोठा पराभव झाला. पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाची रणनिती पवार काका-पुतण्यांवर भारी ठरलीय.,
पुण्यात भाजपची एकतर्फी आघाडी
पुणे महानगरपालिकेच्या 165 जागांपैकी आतापर्यंत 92 जागांचे कल समोर आले आहेत. यापैकी तब्बल 80 जागांवर भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत. विशेष म्हणजे, विरोधी पक्षांना अद्याप दुहेरी आकडाही गाठता आलेला नाही. अजित पवार यांची राष्ट्रवादी 6 जागांवर, तर काँग्रेस आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी प्रत्येकी 3 जागांवर आघाडीवर आहे. म
तमोजणी सुरू होण्यापूर्वीच भाजपने 2 जागा बिनविरोध जिंकून आपले खाते उघडले होते. 2017 च्या निवडणुकीतही भाजपने 162 पैकी 97 जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले होते, तोच करिष्मा यावेळीही पाहायला मिळत आहे.
( नक्की वाचा : BMC Election 2026 Result : मुंबईतील उद्धव ठाकरेंच्या पराभवाचे राज ठरले व्हिलन! 25 वर्षांचा गड अखेर कोसळला )
काका- पुतण्या एकत्र येऊनही फटका
यावेळची पुणे महानगरपालिका निवडणूक एका विशेष कारणामुळे संपूर्ण राज्याच्या केंद्रस्थानी होती. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर पहिल्यांदाच शरद पवार आणि अजित पवार यांनी एकत्र येत ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. मात्र, पुण्यातील मतदारांनी या प्रयोगापेक्षा भाजपच्या नेतृत्वावर अधिक विश्वास दाखवल्याचे सध्याच्या आकड्यांवरून स्पष्ट होत आहे.
( नक्की वाचा : Election Result 2026 : लातूरमध्ये काँग्रेसला बहुमत, संभाजीनगर, नांदेडचे अपडेट काय? मराठवाड्याचे सर्व अपडेट )
पुणे महानगरपालिकेचे विशेष समीकरण
पुणे महानगरपालिका ही राज्यातील महत्त्वाची पालिका मानली जाते. यावेळी शहरात 52.42% मतदान झाले होते. एकूण 41 प्रभागांमधून 165 नगरसेवक निवडले जाणार आहेत. यामध्ये 40 प्रभागातून प्रत्येकी चार नगरसेवक, तर आंबेगाव कात्रज या एका प्रभागातून पाच नगरसेवक निवडले जातात. 2017 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीला 39, शिवसेनेला 10, काँग्रेसला 09 आणि मनसेला 02 जागा मिळाल्या होत्या. यंदाच्या निकालात जुन्या आकडेवारीच्या तुलनेत मोठे फेरबदल होण्याची शक्यता असून भाजप आपली जागा वाढवताना दिसत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world