जाहिरात
Story ProgressBack

राहुल गांधी अमेठी नाही तर 'या' मतदारसंघातून लढवणार निवडणूक, प्रियांकाबाबतही मोठी अपडेट

Rahul Gandhi Priyanka Gandhi : अमेठी आणि रायबरेली लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस कुणाला उतरवणार? हे अद्याप जाहीर झालेलं नाही.

Read Time: 2 min
राहुल गांधी अमेठी नाही तर 'या' मतदारसंघातून लढवणार निवडणूक, प्रियांकाबाबतही मोठी अपडेट
Rahul Gandhi Priyanka Gandhi राहुल गांधी 2019 पर्यंत अमेठीचे खासदार होते. प्रियांका गांधी यांनी आजवर कोणतीही निवडणूक लढवलेली नाही.
मुंबई:

अमेठी आणि रायबरेली लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस कुणाला उतरवणार? हे अद्याप जाहीर झालेलं नाही. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) 2019 पर्यंत अमेठीचे खासदार होते. मागील निवडणुकीत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांनी त्यांचा पराभव केला होता. या निवडणुकीत राहुल पुन्हा अमेठीत उभं राहणार का? याची गेल्या काही दिवसांपासून उत्सुकता आहे. त्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल गांधी अमेठीतून नाही तर रायबरेलीमधून निवडणूक लढवणार आहेत. त्याचबरोबर प्रियांका गांधी यांना अद्याप निवडणुकीच्या मैदानात उतरवण्याची काँग्रेसची योजना नसल्याची माहिती समोर आली आहे.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

अमेठी आणि रायबरेलीमधील काँग्रेस उमेदवारांची नावं काही दिवसांमध्ये जाहीर होतील, असं काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी जाहीर केलं होतं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे उत्तर प्रदेश प्रभारी अविनाश पांडे आणि आमदारांची नेत्या आराधाना मिश्रा यांनी हायकमांडकडं विनंती केली होती. अमेठीमधून राहुल गांधी आणि रायबरेलीमधून प्रियांका गांधी वाड्रा यांनी निवडणूक लढवावी अशी या नेत्यांनी विनंती केली होती.

राहुल गांधी केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. शुक्रवारी दुसऱ्या टप्प्यात येथील मतदान झाले आहे. काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दोन दशकं रायबरेली मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. त्यांनी यंदा लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतलाय. काही महिन्यांपूर्वीच राज्यसभेत त्यांची निवड झाली आहे. 

( नक्की वाचा : सूरतनंतर आता इंदूर! काँग्रेस उमेदवारानं घेतला अर्ज मागं )

अमेठीत पाचव्या टप्प्यात 20 मे रोजी मतदान होईल. अमेठी आणि रायबरेलीतील काँग्रेसच्या उमेदवारांबाबत तुम्हाला काही दिवस वाट पाहावी लागेल, असं काँग्रेस अध्यक्षांनी जाहीर केलं होतं. तर काँग्रेसची निवडणूक समिती याबाबत निर्णय घेईल असं राहुल गांधी यांनी यापूर्वीच स्पष्ट केलंय. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination