राज ठाकरे यांनी नवी मुंबईत मनसे उमेदवाराच्या प्रचारासाठी सभा घेतली होती. या सभेत त्यांनी गणेश नाईक कुटुंबावर त्यांचे नाव न घेता टीका केली. बेलापूर मतदार संघातून मनसेचे गजानन काळे हे उमेदवार आहेत. त्यांच्या प्रचारासाठी ही सभा घेण्यात आली. यावेळी बोलताना राज यांनी एकाच घरातलेल दोघे दोघे उभे आहेत. पण त्यातला एक एकीकडे तर दुसरा तुतारी फुंकतोय अशा शब्दात त्यांनी नाईक कुटुंबावर टीका केली.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
गणेश नाईक हे ऐरोली विधानसभा मतदार संघातून भाजपकडून निवडणूक लढत आहेत. तर त्यांचे पुत्र संदीप नाईक हे बेलापूर मतदार संघातून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून निवडणूक रिंगणात आहे. यावरून राज ठाकरे यांनी गणेश नाईक आणि त्यांच्या कुटुंबाला फटकारले आहे. एकाच घरातली दोन जण वेगवेगळ्या पक्षातून उभे आहेत. एक या पक्षातून तर दुसरा तुतारी फुंकतो. रात्री मात्र हे दोघे ही एकाच घरात जात आहेत. पण यांना कोणीही काही प्रश्न विचारत नाही.
असं का झालं? का होतय? त्याचं उत्तर म्हणजे तुम्हाला त्यांनी गृहीत धरलं आहे. तुम्ही कोण आहात असा प्रश्न त्यांनी मतदारांना या निमित्ताने केला. तुम्ही तर लाचार मतदार आहात. तुम्ही त्यांचे गुला आहात. ते आता निवडणुका आल्यामुळे तुमच्याकडे येतील. तुम्हाला भांडी देतील. पैसेही तुमच्या तोंडावर फेकतील. मग तुम्ही गेल्या पाच वर्षा काय झालं आहे हे विसरून जाल. उन्हात लाईनमध्ये उभे राहाल आणि पुन्हा त्यांनाच निवडून द्याल असे राज ठाकरे यावेळी म्हणाले. पाच वर्ष यांच्याच नावाने टोहो फोडायचे आणि मतदाना दिवशी आपल्याला जे करायचं आहे तेच करायचे.
ट्रेंडिंग बातमी - 'औरंगाबादचं नाव बदलू नका, पुण्याचं नाव संभाजीनगर करा' आंबेडकर असं का म्हणाले?
नवी मुंबई का तयार करण्यात आली हे ही त्यांनी सांगितले. मुंबईत मोठ्या प्रमाणात लोंढे येत होते. त्यामुळे मुंबईची क्षमता संपली होती. त्यामुळे नवी मुंबईची निर्मिती झाली. पण या ठिकाणीही तिच स्थित आहे. इथं येणारी लोकं कोण आहेत. ती कुठून आली आहेत. नवी मुंबईत काय सुविधा आहे. सुसज्ज मैदानं नाहीत. नाट्यगृह नाहीत. मग या नवी मुंबईत काय आहे असा प्रश्न त्यांनी उपस्थितांना केला. इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी काय केलं असा सवाल ही त्यांनी केला. शहर बकाल झालं आहे. अशा वेळीही तुम्हाल डँबिस लोकं लागतात. प्रमाणिक लोक प्रतिनिधी तुम्हाला नकोत का असा प्रश्नही त्यांनी यावेळी केला.
बेलापूर विधानसभा मतदार संघातून भाजपच्या मंदा म्हात्रे या रिंगणात आहेत. तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे संदीप नाईक हे उमेदवार आहे. मनसेचे गजानन काळे हे पुन्हा एकदा नशिब अजमावत आहेत. त्यामुळे या मतदार संघात तिरंगी लढत होत आहे. मंदा म्हात्रे यांनी नाईक आणि काळे यांनी थेट आव्हान दिले आहेत. त्यामुळे बेलापूरमधली जनता यावेळी कोणाला संधी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.