कोकणात प्रचाराचा धुरळा चांगलाच उडाला आहे. उद्धव ठाकरे यांनी नुकताच कोकणचा प्रचार दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी नारायण राणे यांना लक्ष केलं होते. आता राणेंनीही त्याची परतफेड करत उद्धव यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. हिंदूत्व पणाला लावून उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले. ते सध्या मुस्लीमांची बाजू घेवू लागले आहेत. बाळासाहेब ठाकरे आता असता तर त्यांनी उद्धव ठाकरेंना थेट गोळ्या घातल्या असत्या असे वक्तव्य नारायण राणे यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून ठाकरे विरुद्ध राणे असा वाद पुन्हा एकदा पेटला आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांनी मुख्यमंत्री केली नाही. कारण त्यांना त्यांची कुवत माहित होती. बाळासाहेबांनी आधी मनोहर जोशी आणि नंतर मला मुख्यमंत्री केले असे नारायण राणे म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री होण्यासाठी हिंदूत्व पणाला लाववे. त्यातून त्यांना मुख्यमंत्री होता आले. उद्धव ठाकरे ना हिंदू ना मराठा फक्त पद आणि पैसा हवा आहे. बाळासाहेब ठाकरे हे कडवट हिंदूत्ववादी होते. बकरी ईदला परवानगी दिली नाही तर दिवाळीचे आकाश कंदील खाली उतरवा असे उद्धव ठाकरे एका सभेत म्हणाले असे राणे म्हणाले.
त्यांच्या यावक्तव्यावर राणे यांनी जर आता बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी उद्धव ठाकरे यांना गोळ्या घातल्या असत्या असे म्हणाले. उद्धव ठाकरेंचे 25 पेक्षा जास्त आमदार निवडून येणार नाहीत. मुख्यमंत्री असताना ते फक्त दोन वेळा मंत्रालयात गेले. यांना आता कोण मुख्यमंत्री करणार असा प्रश्नही त्यांनी यावेळी केला. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी कोकणासाठी काय केले, असा सवाल ही त्यांनी केला. उद्धव ठाकरेंने नावारूपास आलेल्या कार्यकर्त्यांला कमजोर करण्याचं काम केलं. नारायण राणे,छगन भुजबळ आणि आता एकनाथ शिंदे यांना त्रास दिला असा आरोपही राणे यांनी यावेळी केला.
ट्रेंडिंग बातमी - 'औरंगाबादचं नाव बदलू नका, पुण्याचं नाव संभाजीनगर करा' आंबेडकर असं का म्हणाले?
दरम्यान नारायण राणे यांच्या वक्तव्याचा आदित्य ठाकरे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. असे घाणेरडे विचार अशाच घाणेरड्या व्यक्तींना येवू शकतात. राणेंचे वक्तव्य हे निंदनीय आहे. त्यांचा हेतू आणि मनात विष आहे हे त्यांनी दाखवून दिले आहे. त्यांचा खरा चेहरा समोर आलाय. ह्या घाणीवर आम्ही कधी बोलत नाही. पण गेले वीस वर्षे यांना पगार मिळायचा. आमच्यावर टीका करायला, आम्हाला शिव्या द्यायला. असा हल्लाबोल आदित्य ठाकरे यांनी केला आहे. तर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही राणेंच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world