जाहिरात

निवृत्तीचा निर्णय घेण्याआधी शरद पवारांनी काय केलं? अजित पवारांनीच सांगितली Inside Story

दोन दिवस आधीच शरद पवारांनी अजित पवारांना बोलवलं होतं. त्यावेळी शरद पवारांनी काय काय सांगितलं? त्या बैठकीला कोण कोण उपस्थित होतं? त्या बैठकीत काय ठरलं होतं? याबाबतचा खुलासा अजित पवारांनी पहिल्यांदाच केला आहे.

निवृत्तीचा निर्णय घेण्याआधी शरद पवारांनी काय केलं? अजित पवारांनीच सांगितली Inside Story
मुंबई:

शरद पवारांनी चव्हाण सेंटरमध्ये आपल्या निवृत्तीची घोषणा केली. हा राष्ट्रवादीच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनाही धक्का होता. शिवाय राज्यातील अन्य पक्षाच्या नेत्यांसाठीही धक्का होता. पण याची सर्व कल्पना अजित पवारांना होती. ज्या वेळी ते हा निर्णय घेणार होते त्याच्या दोन दिवस आधीच शरद पवारांनी अजित पवारांना बोलवलं होतं. त्यावेळी शरद पवारांनी काय काय सांगितलं?  त्या बैठकीला कोण कोण उपस्थित होतं? त्या बैठकीत काय ठरलं होतं? याबाबतचा खुलासा अजित पवारांनी पहिल्यांदाच केला आहे. NDTV मराठीला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी हे खुलासे केले आहेत. शिवाय संपुर्ण प्रकरणात आपल्याला व्हिलन ठरवलं गेलं याची खंतही त्यांनी बोलून दाखवी आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

शरद पवारांनी राजकारणातून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला होता. त्याची कल्पना देण्यासाठी मला बोलवलं होतं. त्यावेळी घरी काकी प्रतिभा पवार, सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. त्यावेळी शरद पवारांनी आपण 1 मे ला राजकारणातून निवृत्तीची घोषणा करणार असल्याचे सांगितले. शिवाय ही गोष्ट कुठे बोलू नको असेही शरद पवारांनी मला सांगितल्याचे अजित पवारांनी सांगितले. त्यानंतर एक कमिटी तयार करा. त्या कमिटीचे सुप्रिया सुळे यांना प्रमुख करा अशा सुचनाही शरद पवारांनी केल्या होत्या. त्यानंतर त्यांनी सांगितलेली सुचना आपण पाळू असेही त्यांना सांगितले. शिवाय त्यांनी सांगितलेला निर्णय मी कोणालाही सांगितला नाही. हा घरातला प्रश्न होता. त्यामुळे कुठेही बोललो नाही. 

ट्रेंडिंग बातमी - 'औरंगाबादचं नाव बदलू नका, पुण्याचं नाव संभाजीनगर करा' आंबेडकर असं का म्हणाले?

शरद पवारांनी सांगितल्या प्रमाणे त्यांनी 1 मे रोजी आपल्या निवृत्तीची घोषणा केली.त्यांनी घोषणा केल्यानंतर अनेकांना धक्का बसला. अनेक जणांना रडूही कोसळले. त्यावेळी मी सर्वांना समजवून सांगत होतो. की ही वेळ कधी तरी येणार आहे. त्यांच्या समोरच कोणी तरी नेतृत्व हे तयार झाले पाहीजे. शरद पवार त्यांना मार्गदर्शन करतील. ही भूमिका मी त्यावेळी मांडली होती. पण मी जे बोललो त्याचा उलटा परिणाम झाला. मलाच व्हिलन ठरवले गेले. शरद पवार हे आपले दैवत आहेत. त्यामुळे दैवतासाठी व्हिलन काय अजून काही ही करण्यास मी तयार झालो असतो असे अजित पवार म्हणाले. 1987 पासून करत आलो आहे. त्यांच्या नावाला धक्का लागू नये हीच माझी भूमिका होती असेही ते म्हणाले.     

ट्रेंडिंग बातमी - 'जाती जातीत भांडणे लावण्याचा खतरनाक खेळ...', PM मोदींचे काँग्रेस, 'मविआ'वर टीकास्त्र

पक्षात कोणी नाराज झालं तर तो माझ्यामुळे नाराज झालं हे सांगितलं जायचं. त्यात साहेबांचा काही दोष नाही असं ही सांगितलं जात होतं. आपल्याला स्वार्थी असल्याचे ही म्हटले गेले. त्यांना उत्तर द्यायला आपण कमी पडलो असेही ते म्हणाले. आपण आयुष्यात अनेक चढ उतार पाहीले आहेत. त्यात कधी यश मिळालं तर कधी अपयशाचाही सामना केला. मागच्या घटनांचा जास्त विचार न करता सकारात्मक पणे पुढे जाणाचा विचार करतो असेही ते म्हणाले. 

ट्रेंडिंग बातमी - 'शरद पवार फेक नॅरेटिव्ह फॅक्टरीचे मालक', चिंचवडमधील सभेतून देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल

शरद पवारांना नोटीस आली तेव्हा मी  एम. एस. सी. बँकेचा डायरेक्टर होतो. 65 डायरेक्टर होते. मला अडचणीत आणण्यासाठी ती बँक अडचणीत आणली असे ही अजित पवार म्हणाले. आज ती बँक फायद्यात आहे. जर ती बँक अडचणीत असती तर ती फायद्यात आलीच नसती. पण आम्हाला त्या बँक वरून धोपट धोपट धोपटलं. बदनाम केलं. मला कोणी जाणीवपूर्वक अडकवण्याचा प्रयत्न केला, तर ते मला सहन होत नाही असेही अजित पवार यावेळी म्हणाले. दरम्यान ज्या घोषणा महायुतीने केल्या आहेत त्या दिर्घ काळाचा विचार करून केल्या आहेत असंही त्यांनी स्पष्ट केले आहे. विरोधकांनी दिलेली आश्वासने ही कर्जाचा डोंगर नाही तर हिमालय उभा करणारी आहेत असेही ते म्हणाले. 

ट्रेंडिंग बातमी - "ईडीच्या भीतीमुळे महायुती सरकारसोबत गेलो", 'त्या' पुस्तकातील दाव्यांवर भुजबळ म्हणाले...

आर. आर. पाटील यांनी अजित पवारांनी खुली चौकशी करण्याची परवानगी दिली होती. हे सत्य होते असे अजित पवार म्हणाले. आज आर. आर. पाटील जिवंत असते तर त्यांना नक्की विचारलं असतं की माझं काय चुकलं? खुल्या चौकशीची गरज काय होती? त्या गोष्टीचा प्रचंड त्रास झाला. आपल्या घरी सतत कागदांची तपासणी होत असे. वकिलांची फौज होती. शिवाय जी प्रश्नावली दिली होती त्यावरून राजकारण किती खालच्या पातळीला गेले आहे हे समजले असते.  त्यात पृथ्वीराज चव्हाण यांनी ती फाईल माझ्याकडे आली नव्हती असे ही स्पष्ट केले होते असे अजित पवार म्हणाले. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com