'उद्धव ठाकरेंच्या बॅगेत काय सापडणार, फारफार तर हात रूमाल अन् कोमट पाणी'

या आयोगाच्या लोकांनाही कुठे काय तपासावे हे कळत नाही. ज्या उद्धव ठाकरेंच्या हातून कधी पैसे बाहेर निघाले नाहीत. त्यांच्या बॅग मधून काय निघणार. असे राज म्हणाले.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:


राज ठाकरे यांनी भांडूप इथं झालेल्या प्रचार सभेत उद्धव ठाकरे यांची खिल्ली उडवली. उद्धव ठाकरे यांच्या बॅगा निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी तपासल्या. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली होती. शिवाय मोदी आणि शाह यांच्याही बॅग तपासा असे उद्धव म्हणाले होते. शिवाय माझ्या बॅगा निवडणूक आयोगाच्या लोकांच्याच ताब्यात देतो. त्यातले कपडे मात्र मला द्या असंही ते म्हणाले होते. त्या पार्श्वभूमिवर राज यांनी उद्धव यांची खिल्ली उडवली आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

उद्धव ठाकरे यांची बॅग निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी दोन दिवस तपासली.या आयोगाच्या लोकांनाही कुठे काय तपासावे हे कळत नाही. ज्या उद्धव ठाकरेंच्या हातून कधी पैसे बाहेर निघाले नाहीत. त्यांच्या बॅग मधून काय निघणार.फारफार तर त्यांच्या बॅग मधून हात रूमाल आणि कोमट पाणी. असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांची खिल्ली उडवली. काय आणि कशाला त्यांच्या बॅग तपासता असं राज म्हणाले. 

ट्रेंडिंग बातमी - जुन्या सहकाऱ्यावर राज ठाकरे भडकले, गद्दार म्हणत थेट भिडले

मात्र बॅग तपासल्या म्हणून केवढा तमाशा उद्धव ठाकरे यांनी केला. बॅग चेक करणे हे रुटीन आहे. आमच्याही बॅग तपासल्या गेल्या आहेत. ते निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांचे काम आहे. बरं बॅग तपासताना त्याचा व्हिडीओ ही काढला. त्यांना आयकार्ड मागत आहेत. बरं त्या पुढे जाऊन त्यांचे नियुक्ती पत्रही ते मागत आहेत. कोणाला काय विचारावं हे ही समजत नाही. कोणता अधिकारी नियुक्ती पत्र काय खिशात घेवून फिरतात का असा टोला राज यांनी उद्धव यांना लगावला. 

ट्रेंडिंग बातमी - 'भुजबळांना सर्व काही दिलं, त्यांनी मात्र धोका दिला' येवल्यात येवून पवारांनी पुढचा प्लॅन सांगितला

ज्यांच्या हातात 30 वर्ष महापालिका आहेत. त्यातून शहराचा विचका झालाच आहेत. मराठी माणूसही उद्धवस्त झाला आहे. बाळासाहेब होते त्यावेळी त्यांचे बारीक लक्ष पालिकेच्या कारभारावर असायचं. पण यांचं  बारीक लक्ष फक्त पैशावर असतं असा टोलाही यावेळी राज यांनी उद्धव यांचं नाव न घेता लगावला. उद्धव ठाकरे यांना फक्त मुख्यमंत्रिपदाची माळ गळ्यात पाडून घ्यायची आहे. बाकी सर्व गेलं तेल लावत असं राज ठाकरे म्हणाले. 

Advertisement