जाहिरात
Story ProgressBack

'रामदास कदमांचं पार्सल बोरिवलीत पाठवू', भाजपा नेत्यानं दिला इशारा!

BJP vs Shivsena : भारतीय जनता पक्षाच्या (भाजपा) मेळाव्यात शिवसेना नेते रामदास कदम (Ramdas Kadam, Shivsena) यांच्यावर जोरदार टिका करण्यात आली आहे.

Read Time: 2 min
'रामदास कदमांचं पार्सल बोरिवलीत पाठवू', भाजपा नेत्यानं दिला इशारा!
Ramdas Kadam : भाजपा नेत्यांनं रामदास कदम यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
रत्नागिरी:

राकेश गुडेकर, प्रतिनिधी 

Lok Sabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील जागावाटप अंतिम टप्प्यात आलंय. प्रचारलाही सुरुवात झालीय. त्यानंतरही मित्रपक्षांमधील धुसफूस संपत नाहीय. महायुती आणि महाविकास आघाडीतील मित्रपक्षांमधील धुसफूस सातत्यानं समोर येत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमध्ये झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या (भाजपा) मेळाव्यात शिवसेना नेते रामदास कदम (Ramdas Kadam, Shivsena) यांच्यावर जोरदार टिका करण्यात आली आहे. कदम यांचं पार्सल बोरिवलीत पाठवू असा थेट इशारा भाजपा नेत्यांनी या मेळाव्यात दिला आहे.

'भाजपला डिवचायचा प्रयत्न केलात तर आम्ही दापोलीवाले आहोत. विधानसभा निवडणुका काही महिन्यांवर आहेत. हे खेडचं पार्सल बोरिवलीत पाठवायला वेळ लागणार नाही'

, असा इशारा माजी आमदार आणि भाजपा नेते सूर्यकांत दळवी यांनी दिला. दळवी यांनी या मेळाव्यात रामदास कदम आणि त्यांचे पूत्र आमदार योगेश कदम यांच्यावर जोरदार टीका केली.

मुनगंटीवारांचं 'ते' वादग्रस्त वक्तव्य, वाद पेटला, फटका कोणाला?
 

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून दापोलीमध्ये हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला दापोलीतील सर्व प्रमुख भाजपा पदाधिकारी उपस्थित होते. शिवसेना नेते रामदास कदम विरुद्ध भाजप असं समीकरण गेल्या काही दिवसांमध्ये निर्माण झालं आहे. 2019 मधील विधानसभा निवडणुकीत युती असूनही  भाजप पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीला मतदान करीत माझ्या मुलाला पाडण्याचा प्रयत्न केला, असा आरोप रामदास कदम यांनी केला होता.

कोकणात निवडणुकी आधीच राजकीय शिमगा, महायुतीत वाद पेटणार?

कदम यांच्या आरोपानंतर  भाजपचे स्थानिक नेते, पदाधिकारीही आक्रमक झाले. सोशल मीडियावरूनही त्यांनी रामदास कदम यांना प्रत्युत्तर दिलं होतं. चहापेक्षा किटली गरम-रामदासभाई कदम, हा गरमपणा स्वाभिमानाचा आहे, हुजरेगिरीचा नाही, लवकरच उत्तर देणार, असे स्टेटस ठेवत भाजप पदाधिकाऱ्यांनी आपल्या फेसबुकवर ठेवत आव्हान दिलं होतं.

त्यानंतर, दापोलीतल्या या सभेत देखील रामदास कदम यांना माजी आमदार सूर्यकांत दळवी, तसेच जिल्हाध्यक्ष केदार साठे यांनी रामदास कदम यांना इशारा दिला. सूर्यकांत दळवी हे अलीकडेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून भाजपमध्ये आले आहेत. 

दळवी यांनी यावेळी सांगितलं की, 'आपण दोघ भाऊ भाऊ, तुझं आहे ते वाटून खाऊ,आणि माझं तसंच ठेऊ' ही म्हण रामदास कदम यांना लागू होते. त्यांना सर्व हवं आहे. ते जे बोलतात त्याच्या उलट करतात. मी भाजपामध्ये प्रवेश केल्यानं कदाचित त्यांच्या पोटात पोटशूळ उठला असेल. हा वाघ नाही, कोल्हा आहे, आता तुमच्या पापाचे घडे भरलेत. खरंतर बोलायचं नव्हतं, तुम्ही मित्रपक्ष आहात. मित्रपक्ष म्हणून तुम्ही आम्हाला सहकार्य केलं पाहिजे. पण सगळंच यांना हवं. जास्त हुशारी केलीत तर हे पार्सल बोरिवलीला पाठवायला वेळ लागणार नाही.'

सूर्यकांत दळवी यांनी केलेल्या टिकेला रामदास कदम काय उत्तर देणार? याकडं सर्वांचं लक्ष लागलंय.  रत्नागिरी जिल्ह्यातील रामदास कदम विरुद्ध भाजपा हा वाद येत्या काळात आणखी चिघळण्याची शक्यता आहे. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination