Rapido Driver traumatising Incident Viral Video: सोशल मीडियावर दररोज नवनवीन व्हिडिओ व्हायरल होतात. यामध्ये काही व्हिडिओमागची कथा भावुक करते तर अनेकदा अशा काही घटना, प्रसंग सांगितलेले असतात जे मनाला अस्वस्थ करतात. सध्या अशाच एका व्हिडिओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. या व्हिडिओमध्ये एका तरुणीने तिच्यासोबत घडलेला धक्कादायक प्रसंग सांगितला आहे. या व्हिडिओमध्ये,एक महिलेने तिचा एक साधा रॅपिडो प्रवास कसा एका भयानक अनुभवात बदलला हे सांगितले आहे. तरुणीने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला जो तुफान व्हायरल होत आहे. लोकांनी या घटनेवर संताप व्यक्त केला आहे आणि त्या महिलेला न्याय मिळावा अशी मागणी केली आहे.
एका रॅपिडो राईडने मुलीला आला भयंकर अनुभव
व्हायरल व्हिडिओमध्ये, ती महिला आपला अनुभव सांगताना म्हणते, "मी एका कार्यक्रमासाठी दिल्लीला आले होते. रात्री साधारण ११ वाजता, मी दिल्ली ते ग्रेटर नोएडासाठी रॅपिडो कॅब बुक केली. प्रवास सुरू होताच, ड्रायव्हरचे वागणे विचित्र झाले." तिचा आरोप आहे की, ड्रायव्हर विचित्र वागत होता, संपूर्ण प्रवासात इम्रान हाश्मीची गाणी लावत होता, ज्यामुळे तिला खूप भीती आणि अस्वस्थ वाटत होते. जरी ती महिला रात्री साधारण १२:३० वाजता घरी पोहोचली असली, तरी खरी अडचण त्यानंतर सुरू झाली.
प्रवास संपल्यानंतर लगेचच, ड्रायव्हरने तिला फोन करायला सुरुवात केली. आधी फोन येऊ लागले, मग सतत मेसेज येऊ लागले. त्या महिलेने त्याचा नंबर ब्लॉक केला, पण तरीही वेगवेगळ्या नंबरवरून फोन येतच राहिले. तो वारंवार कॉल करत होता, नंबर ब्लॉक करायलाही वेळ मिळत नव्हता इतके त्याचे कॉल येत होते. सुरुवातीला काही सामान गाडीत राहिल्याने कॉल केला असेल असे वाटले म्हणून त्याला रिप्लाय केला. सर्वात भीतीदायक घटना तेव्हा घडली जेव्हा ड्रायव्हरने कथितरित्या बाथरूममधून व्हिडिओ कॉल केला. या घटनेमुळे ती पूर्णपणे भयभीत झाली.
नेटकऱ्यांच्या जोरदार प्रतिक्रिया
आता, त्या महिलेने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करून हे प्रकरण उघडकीस आणले आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, हजारो लोक त्या महिलेच्या समर्थनार्थ पुढे आले. अनेक वापरकर्त्यांनी आरोपी ड्रायव्हरवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. काहींनी त्या महिलेला पोलीस आणि सायबर गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल करण्याचा सल्लाही दिला.
प्रकरण चिघळल्यानंतर रॅपिडो कंपनीनेही प्रतिक्रिया दिली. कंपनीने म्हटले आहे की अशा वर्तनाला अजिबात सहन केले जाणार नाही. रॅपिडोच्या म्हणण्यानुसार, ॲपवर ग्राहकांचे मोबाईल नंबर लपवले जातात आणि या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. आरोपी ड्रायव्हरवर कारवाई करता यावी यासाठी कंपनीने त्या महिलेच्या राईडचा तपशील मागवला आहे.
Pune VIDEO: पुण्याच्या रस्त्यावर झोंबी? 2 तास 'तो' हललाच नाही, एकाच जागेवर उभा; व्हिडिओने खळबळ
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world