जाहिरात

राजकीय 'गणगोत' वाढलं, भाऊ-बहीण आमदार; सख्खे साडूही जिंकले!

घराणेशाही पुढे सुरू ठेवणाऱ्या या उमेदवारांना मतदारांनी पसंती दिल्याचं दिसून येत आहे. 

राजकीय 'गणगोत' वाढलं,  भाऊ-बहीण आमदार; सख्खे साडूही जिंकले!
मुंबई:

विधानसभा निवडणुकीत अनेक जागांवर 'गणगोत' राजकारणात निवडणूक लढवताना दिसलं. अनेक ठिकाणी भाऊ-बहीण, भाऊ-भाऊ, बाप-लेक निवडणुकीच्या मैदानात होते. विशेष म्हणजे घराणेशाही पुढे सुरू ठेवणाऱ्या या उमेदवारांना मतदारांनी पसंती दिल्याचं दिसून येत आहे. 

राजकीय 'गणगोत' वाढलं,  भाऊ-बहीण आमदार; सख्खे साडूही जिंकले!

नक्की वाचा - राजकीय 'गणगोत' वाढलं, भाऊ-बहीण आमदार; सख्खे साडूही जिंकले!

  • माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांचे पूत्र नितेश राणे कणकवलीतून तर त्यांचे सख्खे भाऊ नीलेश राणे कुडाळमधून जिंकले. त्यामुळे आता राणेंच्या घरात ते स्वत: खासदार आणि दोन्ही मुलं आमदार अशी सत्ता आली आहे. 
  • उद्योगमंत्री उदय सामंत रत्नागिरीतून जिंकले. त्यांचे बंधू किरण सामंत याच जिल्ह्यातून राजापूरमधून विजयी झाले. दोघेही शिंदेंसेनेकडून लढले. 
  • वांद्रे पूर्वमधून जिंकलेले वरुण सरदेसाई हे उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी यांच्या सख्ख्या बहिणीचे पूत्र आहेत.दुसरीकडे उद्धव ठाकरे यांचे पूत्र आदित्य ठाकरे वरळीमधून जिंकले आहेत. त्यामुळे आदित्य आणि वरुण या मावसभावांची जोडी सत्तेत आहे. 
  • अजित पवार गटाचे दिलीप वळसे पाटील हे आंबेगावमधून जिंकले. तर त्यांच्या भगिनी सईताई डहाके या कारजांमधून भाजपकडून जिंकल्या.  

सर्वात तरुण आमदार, रोहित पाटील! पहिल्या प्रतिक्रियेने हृदय जिंकलं; म्हणाले...

नक्की वाचा - सर्वात तरुण आमदार, रोहित पाटील! पहिल्या प्रतिक्रियेने हृदय जिंकलं; म्हणाले...

  • दानवेंची कन्या अन् पूत्र दोघेही विधानसभेत...माजी केंद्रीय राज्यमंत्री ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांचे पुत्र संतोष भोकरदनमधून पुन्हा विजयी झाले आहेत. दानवेंच्या कन्या संजना या शिंदे सेनेकडून कन्नडमधून विजयी झाल्या आहेत. लोकसभेत दानवे पराभूत झाले होते, परंतू त्यांना विधानसभेत मोठं गिफ्ट मिळालं आहे. 
  • इस्लामपूरमधून शरद पवार गटाचे जयंत पाटील जिंकले आणि त्यांचे सख्खे साडू सत्यजीत कदम (भाजप) यांनी शिराळामधून बाजी मारली. जयंत पाटील यांचे भाचे प्राजक्त तनपुरे (शरद पवार गट) यांचा मात्र राहुरीतून पराभव झाला. 
  • भाजपचे शिवाजीराव कर्डिले राहुरीमधून जिंकले, त्याचे जावई अजित पवार गटाचे संग्राम जगताप यांनी अहमदनगर शहरातून विजय मिळवला. 
  • माजी मंत्री गणेश नाईक हे ऐरोलीतून जिंकले पण त्यांचे पूत्र संदीप नाईक यांचा मात्र बेलापूरमध्ये भाजपच्या मंदा म्हात्रे यांनी पराभव केला. 

महाराष्ट्रात महिला आमदारांचा टक्का कमीच...

  • यंदा विधानसभेत 363 महिला उमेदवार रिंगणात उतरल्या होत्या. यापैकी केवळ 22 महिला विजयी झाले आहेत. म्हणजेच 288 पैकी महिला आमदारांची संख्या केवळ 22 इतकी आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com