राज्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत जर कोणती चर्चा झाली असेल तर ती सांगली पॅटर्नची चर्चा झाली. काँग्रेसने इथे बंडखोरी करत आपल्या उमेदवाराला निवडून ही आणलं. शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवारा बरोबर भाजपचा उमेदवारही चारीमुंड्या चित झाला. आता हा सांगली पॅटर्न सांगलीमध्ये विधानसभेला होत आहे. पण हा पॅटर्न काँग्रेसमध्येच होताना दिसतोय. त्यामुळे सांगली पॅटर्न आता काँग्रेसवरच उलटणार की काय अशा चर्चा सुरू झाली आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सांगली विधानसभा मतदार संघातून माजी मंत्री मदन पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील या इच्छुक होत्या. आपल्याला उमेदवारी मिळेल अशी त्यांना शेवटपर्यंत आशा होता. मात्र काँग्रेसने सांगली मतदार संघातून पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे जयश्री पाटील या नाराज झाल्या. त्यांनी थेट अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांनी उमेदवारी मागे घ्यावी म्हणून काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांच्या बरोबर संपर्कही केला होता. त्यांना विधानपरिषदेचे आश्वासनही देण्यात आले. मात्र निवडणूक लढणार आणि जिंकणार अशी भूमीका त्यांनी घेतली आहे.
ट्रेंडिंग बातमी - 'ते काय औरंगजेब आहे का? स्वारी करायला निघाले' दानवे- सत्तार वाद पेटला
सांगलीच्या काँग्रेस नेत्या आणि काँग्रेस बंडखोर जयश्री मदन पाटील यांची बंडखोरी अखेर कायम राहिली आहे. जयश्री मदन पाटील यांनी सांगलीत अपक्ष लढण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यांनी काँग्रेस उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या विरोधात लढण्याचा निर्णय घेतला आहे. 5 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता सांगलीच्या काँग्रेस भवन समोरच जयश्री पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ करणार आहेत. त्यामुळे सांगलीत काँग्रेस उमेदवारांच्या अडचणीत भर पडली आहे. जयश्री पाटील यांनी आपली लढत भाजपा विरोधात असल्याचे स्पष्ट करीत, मी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असून माघार नाही असे जाहीर केले आहे.
जयश्री पाटील यांनी घेतलेल्या या भूमीकेमुळे काँग्रेसलाच आता सांगली पॅटर्नचा सामना करावा लागणार आहे. सांगली विधानसभा मतदार संघात काँग्रेसची ताकद आहे. मात्र जयश्री पाटील यांच्या बंडखोरी मुळे काँग्रेसच्या मतांचे विभाजन होणार आहे. याचा थेट फायदा भाजप उमेदवाराली होऊ शकतो. त्यामुळे जयश्री पाटील यांची समजूत कशी काढायची असा प्रश्न काँग्रेस श्रेष्ठींना पडला आहे. मागील निवडणुकीत पृथ्वीराज पाटील यांना निसटता पराभव स्विकारावा लागला होता. त्यामुळे यावेळी तरी आमदार होता येईल हे स्वप्न घेवून ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मात्र जयश्री यांच्या बंडखोरी मुळे ते कितपत सत्यात उतरेल याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world