जाहिरात

Sangli News : सांगलीत रंगतदार खेळ, दिग्गजांना पराभवाची धूळ, कुणी मारली बाजी? पाहा विजयी नगरसेवकांची यादी एकत्र

Sangli Election Result 2026: सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही.

Sangli News : सांगलीत रंगतदार खेळ, दिग्गजांना पराभवाची धूळ, कुणी मारली बाजी? पाहा विजयी नगरसेवकांची यादी एकत्र
Sangli Election Result 2026: सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेतील सर्व विजयी उमेदवारांची यादी इथं वाचा
सांगली:

शरद सातपुते, प्रतिनिधी 

Sangli Miraj Kupwad Municipal Election Result 2026: सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. त्यामुळे सत्तेचे समीकरण आता युतीवर अवलंबून असणार आहे. भारतीय जनता पार्टीने मुसंडी मारत 39 जागा जिंकल्या आहेत, मात्र सत्तेसाठी आवश्यक असलेला 40 हा आकडा गाठण्यासाठी त्यांना केवळ एका जागा कमी पडली.

एकीकडे भाजप सत्तेच्या अगदी जवळ पोहोचली असताना दुसरीकडे महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये मोठी पडझड पाहायला मिळाली आहे. या निकालामुळे सांगलीच्या राजकारणात आता नवीन समीकरणांची चर्चा सुरू झाली असून अपक्ष आणि मित्रपक्षांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.

काँग्रेसची दमदार कामगिरी आणि राष्ट्रवादीला धक्का

या निवडणुकीत काँग्रेसने आमदार विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत प्रभावी कामगिरी केली आहे. काँग्रेसला एकूण 18 जागा मिळाल्या असून त्यांनी शहरात आपले अस्तित्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या फुटीचा परिणाम निकालांवर स्पष्टपणे दिसत आहे.

( नक्की वाचा : TMC Election 2026 : ठाण्यात शिवसेनेचेच वर्चस्व; महापौरपदासाठी 'ही' नावं आघाडीवर, पाहा कुणाला देणार शिंदे बढती! )

अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने 16 जागा जिंकून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. मात्र, जयंत पाटील यांच्यासाठी हा निकाल धक्कादायक मानला जात आहे, कारण शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ 3 जागांवर समाधान मानावे लागले आहे. विशेष म्हणजे, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला या निवडणुकीत खातेही उघडता आले नाही, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने 2 जागा जिंकून आपले अस्तित्व दाखवून दिले आहे.

सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेमध्ये पक्षीय बलाबल

भाजपा -  39
शिवसेना (एकनाथ शिंदे) - 
काँग्रेस - 18
राष्ट्रवादी ( अजित पवार)-  16
राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार ) -  3


सांगली महानगरपालिकेतील सर्व विजयी उमेदवार ( Sangli Municipal Election Result 2026 Ward Wise Winners)

प्रभाग क्रमांक 1 

रवींद्र सदामते -  भाजपा
माया गडदे  - भाजपा
पद्मश्री पाटील - भाजपा
चेतन सूर्यवंशी - भाजपा

प्रभाग क्रमांक 2

प्राजक्ता सनी धोत्रे - भाजपा
गजानन रामू मगदूम - राष्ट्रवादी
मालुसरे महावीर खोत - भाजपा 
प्रकाश रमेश पाटील - भाजपा


( नक्की वाचा : Latur Election Result 2026 : लातूरमध्ये देशमुखच धुरंधर, वाचा सर्व विजयी उमेदवारांची यादी, वाचा एका क्लिकवर )

प्रभाग क्रमांक 3

संदीप आवटी - भाजपा
सागर वनखंडे - शिवसेना  
शैला शिवाजी दुर्वे - राष्ट्रवादी 
रेश्मा जुबेर चौधरी - राष्ट्रवादी 

प्रभाग क्रमांक 4

निरंजन सुरेश आवटे - भाजपा 
मोहन दत्तात्रय वाटवे - भाजपा 
विद्या बाबासाहेब नलवडे -  भाजपा 
अपर्णा विवेक मोटे - भाजपा

प्रभाग क्रमांक 5

शिरीन पिरजादे -  राष्ट्रवादी अप
बबिता मेंढे - काँग्रेस
संजय मेंढे -  काँग्रेस
करण जामदार -  राष्ट्रवादी अप

प्रभाग क्रमांक 6

मैनुद्दीन बागवान - राष्ट्रवादी अप
अजून काजी - राष्ट्रवादी उप
बिलकीश बुजरूक -  काँग्रेस
मुब्बशिरीन बागवान - काँग्रेस

( नक्की वाचा : Amravati Result : अमरावतीमध्ये चुरस वाढली, कोणत्याच पक्षाला बहुमत नाही, वाचा सर्व विजयी उमेदवारांची यादी )


प्रभाग क्रमांक 7 

गणेश माळी - भाजपा
भाजपच्या बानु जमादार - भाजपा
उज्वला कांबळे - भाजपा
दयानंद खोत - भाजपा

प्रभाग क्रमांक 8

विष्णू माने -  राष्ट्रवादी अप
दीपक वायदंडे -  भाजपा
मीनाक्षी पाटील  - काँग्रेस
योगिता राठोड -  भाजपा

प्रभाग क्रमांक 9 

संतोष पाटील - भाजपा
वर्षा सरगर - भाजपा
रोहिणी पाटील - भाजपा
अतुल माने - भाजपा

प्रभाग क्रमांक 10

जगन्नाथ ठोकळे - भाजपा
गीता पवार -  भाजपा
वर्षा निंबाळकर -  काँग्रेस
प्रकाश मुळके -  भाजपा

प्रभाग क्रमांक 11

हर्षवर्धन पाटील -  काँग्रेस 
अश्विनी कोळेकर -  काँग्रेस 
रमेश सरजे -  काँग्रेस
अंजली जाधव - काँग्रेस


प्रभाग क्रमांक 12 

लक्ष्मी सरगर - भाजपा
रईसा शिकलगार - भाजपा
संजय यमगर - भाजपा
धीरज सूर्यवंशी - भाजपा


प्रभाग क्रमांक 13 

अभिजीत कोळी -  राष्ट्रवादी
दिपाली दिलीप पाटील -  काँग्रेस
अश्विनी चेतन कदम -  काँग्रेस

प्रभाग क्रमांक 14 


युवराज बावडेकर- शिवसेना (शिंदे)
अनिता पवार - भाजपा 
मनीषा कुकडे  - भाजपा 
उदय बेलवलकर -  भाजपा


प्रभाग क्रमांक 15 

मंगेश चव्हाण - काँग्रेस
फिरोज पठाण  - काँग्रेस
स्मिता यमगर - काँग्रेस
सोनल पाटील सावर्डेकर - काँग्रेस

प्रभाग क्रमांक 16 

स्वाती शिंदे - भाजपा
राजेश नाईक-  काँग्रेस
सलमा शिकलगार -   काँग्रेस
मयूर पाटील -  काँग्रेस

प्रभाग क्रमांक 17 

दिग्विजय प्रदीप सूर्यवंशी -  राष्ट्रवादी 
साक्षी राजेंद्र बोरगावे - राष्ट्रवादी (अप)
प्रार्थना अमित शिंदे - राष्ट्रवादी (अप)
 लक्ष्मण शिवराम नवलाई - भाजपा 

प्रभाग क्रमांक 18 

अभिजीत भोसले -  राष्ट्रवादी अप 
नसीमा नाईक -  राष्ट्रवादी अप 
वैशाली राजू गवळी - भाजपा 
गाथा जगदाळे -  भाजपा

प्रभाग क्रमांक 19 

युवराज गायकवाड - राष्ट्रवादी शप 
अलका ऐवळे -  भाजपा
 सुरेश बंडगर -  राष्ट्रवादी शप 
कीर्ती देशमुख -  भाजपा

प्रभाग क्रमांक 20

अत्तहर नायकवडी -  राष्ट्रवादी अप 
रेखा विवेक कांबळे -  राष्ट्रवादी अप
अश्विनी कोळी -  राष्ट्रवादी अप
 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com