जाहिरात

Sangli News: आमची भूमिका ठरवणारा भाजपा कोण? शिंदेंच्या मंत्र्यांनी भाजपला खडसावले, सांगलीत ट्वीस्ट

सांगली जिल्हा परिषदेत एकून 61 जागा आहेत. बहुमतासाठी 31 जणांच्या पाठिंब्याची गरज आहे.

Sangli News: आमची भूमिका ठरवणारा भाजपा कोण? शिंदेंच्या मंत्र्यांनी भाजपला खडसावले, सांगलीत ट्वीस्ट
  • सांगली जिल्हा परिषद निवडणुकीत कोणालाही स्पष्ट बहुमत मिळालेले नाही
  • राष्ट्रवादी पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या असून काँग्रेसच्या मदतीने ते सत्ता स्थापनेच्या जवळ आहेत
  • मंत्री शंभूराज देसाई यांनी भाजपला स्पष्ट सांगितले की शिवसेना आपली भूमिका स्वतः ठरवेल
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
सांगली:

जिल्हा परिषद निवडणुका नुकत्याच पार पडल्या आहेत. सांगली जिल्हा परिषदेचा निकला ही जाहीर झाला आहे. इथं कुणाला ही तसं स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही. छोट्या पक्षांच्या हातात इथं सत्तेची चावी आहे. त्यात भाजपने  जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू केल्या आहेत. राष्ट्रवादी शरद पवार पक्षा सांगली जिल्हा परिषदेत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. काँग्रेसच्या मदतीने ते ही सत्तेच्या जवळ आहेत. त्यात आता शिवसेना शिंदे गटाकडून मंत्री शंभूराज देसाई यांनी मोठं विधान केलं आहे. त्यामुळे भाजपचे टेन्शन वाढले आहे. शिवाय त्यांचे सत्ता स्थापनेचे गणित बिघडण्याची भीती ही निर्माण झाली आहे.  

भाजपने आम्हाल गृहीत धरू नये. सांगलीत आम्ही काय करावे हे आम्ही शिवसेना बघून घेवू. आमची भूमिका ठरवणारे भाजपा कोण? अशा शब्दात शंभूराज देसाई यांनी भाजपला खडसावले आहे. गरज भासले की, म्हणायचे हे आमचेच आहेत, पण आमची भूमिका आम्ही ठरवू, असा इशारा, मंत्री शंभूराज देसाई यांनी भाजपाला दिला आहे. सांगली जिल्हा परिषदेत आम्ही परस्पर विरोधत लढलो आहोत असं ही देसाई म्हणाले. सांगली जिल्हा परिषद निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेबाबत चंद्रकांत पाटलांकडून शिवसेना शिंदे पक्षाला गृहीत धरण्यात आले. यावरून देसाई यांनी संताप व्यक्त केला आहे.  

नक्की वाचा - Exclusive: रात्रीच्या अंधारात'त्यांचा' वावर वाढतोय, दहशतीने गावचं बंद, AI कॅमेऱ्यात सर्व काही कैद

सांगली जिल्हा परिषदेमध्ये कोणासोबत जायचं, त्याबाबत नूतन सदस्य आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या सोबत चर्चा करून ठरवलं जाईल असं देसाई यांनी स्पष्ट केलं आहे.  त्या बाबतचा अहवाल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना देण्यात येईल. अंतिम आदेशानंतरच सांगली जिल्हा परिषदेमध्ये नेमकं कोणाबरोबर जायचं असं देखील शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केले आहे. शिवसेना शिंदे गटा शिवाय भाजपला सांगली जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करता येणार नाही. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाकडून करण्यात आलेलं विधान महत्वाचं आहे. भाजपला ही आता शिवसेनेला गृहीत धरता येणार नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे संख्याबळ ही सत्तेच्या अगदी जवळ आहे.  

नक्की वाचा - Pune News: पुण्यातील MIT कॉलेजमध्ये राडा! बांगलादेशच्या झेंड्यावरून फूड स्टॉल्सची तोडफोड

सांगली जिल्हा परिषदेत एकून 61 जागा आहेत. बहुमतासाठी 31  जणांच्या पाठिंब्याची गरज आहे. निकालात सर्वाधिक जागा या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला मिळाल्या आहेत. त्यांना 18 जागा मिळाल्या आहेत. तर काँग्रेसला 11 जागांवर विजय मिळाला आहे. शिवसेना ठाकरे गटाला एक जागेवर समाधान मानावे लागले आहे. त्यामुळे मविआचे संख्याबळ हे  30 झाले आहे. बहुमतासाठी त्यांना केवळ एका जागेची गरज आहे. तर दुसरीकडे भाजपाला, 16, राष्ट्रवादी अजित पवार गटाला 06, आणि शिवसेना शिंदे गटाला 07 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे त्यांचे महायुतीचे संख्याबळ 29 होते. शिवाय रयत क्रांती संघटनेचा महायुतीला पाठिंबा आहे. त्याचा एक सदस्य निवडून आला आहे. त्यामुळे महायुतीचे ही संख्याबळ 30 झाले आहे. अशा वेळी जनसुराज्य शक्ती पक्षाच्या एका सदस्यावर सर्वांची मजल असणार आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com