जाहिरात

सातारकरांना 2 खासदार निवडण्याची संधी' कोल्हेंची ऑफर काय?

Satara Lok Sabha Election : सातारा लोकसभा मतदारसंघात उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात मुख्य लढत आहे.

सातारकरांना 2 खासदार निवडण्याची संधी' कोल्हेंची ऑफर काय?
अमोल कोल्हे यांनी सातरकरांना खास ऑफर दिली आहे.
सातारा:

सातारा लोकसभेची निवडणूक ही अंतिम टप्प्यात आलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे स्टार प्रचारक खासदार अमोल कोल्हे साताऱ्यामध्ये आले होते. त्यांच्या एका वक्तव्याने सातारकरांसमोर पेच निर्माण झाला आहे. सातारकरांना दोन खासदार मिळतील, असे वक्तव्य अमोल कोल्हे यांनी सर्वांना कोड्यात टाकले आहे. पण ते दोन खासदार कसे मिळतील याचे गणितही त्यांनी उलगडून सांगितले आहे.  

राजगादी राज्यसभेत,लोकनेता लोकसभेत 

सातारा लोकसभेत उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात लढत होत आहे. अमोल कोल्हे यांनी सांगितले, उदयनाराजे महाराज हे सध्या राज्यसभेचे सदस्य आहेत. त्यांचा कार्यकाळ अजूनही शिल्लक आहे. त्यामुळे ते विद्यमान खासदार आहेत. त्यामुळे राजगादी  ही राज्यसभेत राहील. तर शशिकांत शिंदे हे लोकनेते आहेत. त्यामुळे ते लोकसभेत जातील. तसे झाले तर साताऱ्याला दोन दोन खासदार मिळतील. उदयन राजे राज्यसभेत तर शशिकांत शिंदे हे लोकसभेत जातील. असे सांगत त्यांनी शशिकांत शिंदेंना निवडून देण्याचे आवाहन केले.  

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

उदयन राजेंवर केली टिका 

खासदार अमोल कोल्हे यांची वाई येथील पाचवड येथे बोलताना थेट उदयनराजे यांच्या कॉलर उडवण्यावर टिका केली आहे. कॉलर उडवायची असेल शेतकऱ्यांना हमी भाव मिळत असेल तर उडवा, तरुणांना रोजगार मिळतं असेल तर उडवा, माता भगिनीना महागाई पासुन सुटका मिळतं असेल तर उडवा. मग आम्ही म्हणून तुमची कॉलर टाईट आहे.  उदयन राजे हे नेहमी प्रत्येक कार्यक्रमात कॉलर उडवताना दिसतात. तो धागा पकडत कोल्हे यांनी टिका केली. 

( नक्की वाचा : साताऱ्यात 25 वर्षांमधील सर्वात मोठा बदल, पण परंपरा कायम राहणार का? )

राष्ट्रवादीच्या 10 जागा निवडून येणार 

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट राज्यात दहा जागा लढत आहे. या दहा पैकी दहा जागा जिंकू असा दावा अमोल कोल्हे यांनी केला आहे. शिवाय देशात इंडिया आघाडीचे सरकार येईल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. मोदी लाट आता ओसरली आहे असेही ते म्हणाले.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Previous Article
'राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येऊ दे', खडसेंचं बाप्पाला साकडं
सातारकरांना 2 खासदार निवडण्याची संधी' कोल्हेंची ऑफर काय?
Wardha Lok Sabha Election Will Ramdas Tadas get a hat trick
Next Article
रामदास तडस यांची हॅटट्रिक की क्लिन बोल्ड? वर्ध्यात कुणाचा बोलबाला?