मविआची सभा शरद पवारांनी गाजवली, भाजपला ठोकून काढलं

छत्रपती शिवाजी महाराजांचा कोसळलेला पुतळा ते अगदी महिलांच्या प्रश्नाबाबत पवारांनी भाजपला लक्ष केलं.

जाहिरात
Read Time: 3 mins
मुंबई:

महाविकास आघाडीची संयुक्त जाहीर सभा मुंबईत पार पडली. या सभेला राहुल गांधी, मल्लाकार्जून खरगे, उद्धव ठाकरे उपस्थित होते. पण ही सभा खऱ्या अर्थाने गाजवली ती शरद पवारांनी. शरद पवारंनी या सभेत भाजपवर एका मागोमाग एक आरोपांच्या फैर झाडल्या. छत्रपती शिवाजी महाराजांचा कोसळलेला पुतळा ते अगदी महिलांच्या प्रश्नाबाबत पवारांनी भाजपला लक्ष केलं. शिवाय महाविकास आघाडीचे सरकार आल्यास शेतकऱ्यांसाठी काय करणार आहे ती गॅरंटीही पवारांनी सांगितली. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

भाषणाच्या सुरूवातीला शरद पवारांनी मुंबईकरांचे आभार मानले. सहा महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभेत मुंबईकर जनता मविआच्या मागे खंबीर पणे उभी राहीली. याचा आवर्जून उल्लेख त्यांनी यावेळी केला. विधानसभेला ही तुम्ही तसाच निकाल द्या असे आवाहन त्यांनी मुंबईकरांना केले. त्यानंतर त्यांनी आपल्या मोर्चा भाजपकडे वळवला. महाराष्ट्र हे एक शक्तीशाली राज्य आहे. आर्थिक दृष्ट्या पुढारलेले आहे. ते नेहमीच प्रत्येक क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर राहीले आहे. पण भाजप सरकार आल्यानंतर हे महाराष्ट्र हे सहाव्या क्रमांकावर गेले आहे. त्याला हे भाजप सरकार दोषी असल्याचा आरोप त्यांनी केला. परकीय गुंतवणुकीत राज्य मागे पडले आहे. त्यालाही भाजप जबाबदार असल्याचे ते म्हणाले. 

ट्रेंडिंग न्यूज-  महिलांना दरमहा 3 हजार, मोफत बस प्रवास! मविआच्या 5 गॅरंटी कोणत्या?

त्यानंतर त्यांनी कायदा आणि सुव्यवस्थेवरही भाष्य केले. या राज्याची ओळख कायदा आणि सुव्यवस्था राखणारे म्हणून होती. मात्र आता याच राज्यात स्त्रीयांवरील अत्याचारात वाढ झाली आहे. जवळपास 64 हजार मुली आणि महिला गायब झाल्या आहेत. त्यांचा अजून ही पत्ता लागलेला नाही. अशी स्थिती या आधी महाराष्ट्रात कधीच नव्हती. अशी स्थिती निर्माण करण्यास केवळ आणि केवळ भाजप सरकार कारणीभूत असल्याचा आरोप त्यांनी या निमित्ताने केला. 

ट्रेंडिंग बातमी - लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवणार, शिंदेनी दिली 10 मोठी आश्वासनं

सिंधुदुर्गात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. हा पुतळा समुद्रातील वाऱ्या मुळे कोसळल्याचे सरकारने सांगितले.पण भ्रष्टाचार किती टोकाला गेला आहे याचे हे उत्तम उदाहरण असल्याचे शरद पवार म्हणाले. राज्यात अनेक पुतळे आहेत. मुंबईतही पुतळे आहेत. ते कधी कोसळले नाहीत. कारण त्यात भ्रष्टाचार झाला नाही. सिंधुदुर्गातील महाराजांचा पुतळ्यातही या भाजप सरकारने भ्रष्टाचार केला असा आरोप पवारांनी केला. याच पुतळ्याचे अनावरण मोदींनी केले होते. हा पुतळा कोसळला त्याला या सरकारचा भ्रष्टाचार जबाबदार असल्याचे ते म्हणाले.     

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - लाल संविधान दाखवून कुणाला इशारा देताय? देवेंद्र फडणवीस यांचा राहुल गांधींना प्रश्न

दरम्यान त्यांनी यावेळी जर महाविकास आघाडीचे सरकार आले तर कृषी समृद्धी योजना लागू करणार असल्याचे स्पष्ट केले. या योजने अंतर्गत  शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्जमाफ करण्याची गॅरंटी शरद पवारंनी दिली. शिवाय नियमित कर्जफेडीसाठी 50 हजार रुपयांचे प्रोत्साहन देण्याचेही ते म्हणाले. आघाडीचं सरकार यावं अशी आमची इच्छा आहे. त्यासाठी तुमची साथ हवी आहे. जर महागाईपासून सुटका हवी असेल, स्त्रीयांना सुरक्षित जिवन हवं असेल, सर्वच समाज घटकाना सन्मानाचे जगणे हवे असेल तर महाविकास आघाडीला निवडून द्या असे आवाहन शेवटी शरद पवारांनी केले.