महायुती पाठोपाठ महाविकास आघाडीने ही निवडणूक जाहीरनाम्यात 5 गॅरंटीची घोषणा केली आहे. मुंबईत महाविकास आघाडीची संयुक्त जाहीर सभा घेण्यात आली. या जाहीर सभेत राहुल गांधी यांच्या उपस्थितीत या पाच गॅरंटीची घोषणा करण्यात आली. त्यात महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 3000 रूपये देण्यात येणार आहेत. त्याच बरोबर महिलांना मोफत बस प्रवास देण्यात येणार आहे. या पाच गॅरंटीमध्ये महीला,शेतकरी, बेरोजगार तरूण यांना केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
ज्या पाच गॅरंटी देण्यात आल्या आहे त्यात महालक्ष्मी योजनेचा समावेश आहे. या योजने अंतर्गत महिलांना दर महिन्याला 3 हजार रूपये देण्यात येणार आहे. त्याच बरोबर महिला व मुलींना मोफत बस प्रवासाची सेवा पुरवण्यात येईल. महिलां बरोबरच शेतकऱ्यांसाठीही गॅरंटी देण्यात आली आहे. त्यात शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफ देण्यात येईल. तसेच नियमित कर्जफेडीसाठी 50 हजार रुपयांचे प्रोत्साहन देण्यात येईल. जातनिहाय जनगणना करणार. शिवाय 50 टक्के आरक्षण मर्यादा हटवण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची गॅरंटीही देण्यात आली आहे. 25 लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा व मोफत ओषधे देण्यात येणार आहेत. तर बेरोजगार तरुणांना दर महिन्याला 4000 रुपयांपर्यंत मदत देण्याची पाचवी गॅरंटी देण्यात आली आहे.
ट्रेंडिंग बातमी - लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवणार, शिंदेनी दिली 10 मोठी आश्वासनं
महाविकास आघाडीने दिलेल्या 5 गॅरंटी
• महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला 3000 रुपये, महिला व मुलींना मोफत बस प्रवास
• शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्जमाफ तसेच नियमित कर्जफेडीसाठी 50 हजार रुपयांचे प्रोत्साहन
• जातनिहाय जनगणना करणार, 50 टक्के आरक्षण मर्यादा हटवण्यासाठी प्रयत्नशील
• 25 लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा व मोफत ओषधे
• बेरोजगार तरुणांना दर महिन्याला 4000 रुपयांपर्यंत मदत
ट्रेंडिंग बातमी - मधूरिमा राजेंनी उमेदवारी मागे का घेतली? सतेज पाटील पहिल्यांदा बोलले, पण थेट बोलले
दरम्यान महायुतीचनेही आपली दहा वचने मंगळवारी झालेल्या संयुक्त जाहीर सभेत दिली होती. एकनाथ शिंदे यांनी दहा वचनांची घोषणा केली आहे. त्यात लाडकी बहीण योजनेच्या पैशात सत्ता आल्यास वाढ करणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. सध्या 1500 रूपये दिले जातात. त्यात वाढ करून 2100 रूपये दर महिन्याला देणार असल्याचे शिंदे यांनी जाहीर केले. त्यानंतर 25 हजार महिलांची भरती पोलिस दलात केली जाईल. शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल. शेतकरी सन्नान योजनेच्या रक्कम मध्ये ही वाढ केली जाईल. सध्या 12 हजार दिले जातात. ते 15000 करण्यात येईल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world