सोलापुरात महायुतीला मोठा धक्का, शिवसेनेचा माजी आमदार शरद पवार गटात प्रवेश करणार

शरद पवार यांच्या उपस्थितीत नारायण पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
सोलापूर:

संतोष कुलकर्णी, पंढरपूर

लोकसभा निवडणुकीदरम्यान सोलापूरच्या करमाळ्यात शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. करमाळ्याचे शिवसेनेचे माजी आमदार नारायण पाटील यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. नारायण पाटील यांनी धनुष्यबाण सोडत हाती तुतारी घेतली आहे. 

शरद पवार यांच्या उपस्थितीत नारायण पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत. नारायण पाटील यांनी घेतलेल्या भूमिकेचा फटका महायुतीला लोकसभा निवडणुकीत बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

(नक्की वाचा - 'मैत्री जपली त्यासाठी धन्यवाद, पण माझं मतदान तुम्हाला नाही'; गणपत कदम यांनी स्पष्टच केलं)

करमाळा विधानसभा मतदारसंघात 2019 ची निवडणूक संजय शिंदे हे अपक्ष म्हणून लढले होते. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला होता. तर शिवसेनेचे माजी आमदार नारायण पाटील यांनीही अपक्ष म्हणूनच निवडणूक लढवली होती. रश्मी बागल यांना भाजप-शिवसेना युतीने उमेदवारी दिली होती. अटीतटीच्या लढतीमध्ये अपक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर निवडणूक लढवलेले संजयमामा शिंदे विजयी झाले. त्यानंतर तिकीट न मिळालेले शिवसेनेचे माजी आमदार नारायण पाटील नाराज होते. या ना त्या कारणाने ते शिवसेनेपासून दूर जात राहिले.  

(नक्की वाचा - आधी लगीन लोकशाहीचं! मंडपात जाण्यापूर्वी नवरा, नवरदेव मतदान केंद्रावर)

आता रश्मी बागल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तर संजय शिंदे अजित पवार गटाचे कट्टर समर्थक आहे. त्यामुळे 2024 च्या विधानसभा निवडणुकीत आपल्याला तिकीट मिळेल का हे प्रश्नचिन्ह त्यांच्यासमोर आहे. त्यामुळे नाराज असलेल्या नारायण पाटील यांनी शरद पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. अकलूज येथील बैठकीत त्यांनी तसे सांगितले होते. त्यामुळे पाटील यांनी  धैर्यशील मोहिते पाटील यांना आपला पाठिंबा असल्याचे जाहीर केले होते.  

Advertisement

धेर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ करमाळा येथे होणाऱ्या सभेत नारायण पाटील शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. नारायण पाटील यांनी तुतारी हातात घेतल्याने करमाळा तालुक्यातील राजकारणाला एक वेगळं वळण मिळालं आहे. 

Topics mentioned in this article