दक्षिण मुंबईतून भाजपची माघार, शिवसेना आमदाराला उमेदवारी जाहीर

दक्षिण मुंबईच्या जागेवर भाजपने देखील दावा केला होता. भाजपकडून राहुल नार्वेकर यांना येथून उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात होता.

जाहिरात
Read Time: 2 mins

महायुतीचं मुंबईतील सर्व जागांवरचं जागावाटप जाहीर झालं आहे. मुंबईतील सहा पैकी पाच जागांवर आधीच उमेदवार जाहीर करण्यात आले होते. उरलेल्या दक्षिण मुंबईच्या जागेचा तिढा देखील सुटला आहे. दक्षिण मुंबईतून भाजपने माघार घेतल्याने ही जागा शिवसेनेच्या वाट्याला आली आहे. येथून शिवसेनेच्या विद्यमान आमदार यामिनी जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

दक्षिण मुंबईच्या जागेवर भाजपने देखील दावा केला होता. भाजपकडून राहुल नार्वेकर यांना येथून उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती. राहुल नार्वेकर यांनी काही दिवसांपूर्वीच आपला प्रचार देखील सुरु केला होता. भेटीगाठी देखील सुरु केल्या होत्या. मात्र शिवसेनेला ही जागा सुटल्याने मुंबईत शिवसेना-भाजपला समान वाटा मिळाला आहे. 

(नक्की वाचा - 'होय, मी भटकती आत्मा...', पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'त्या' वक्तव्याला शरद पवारांचं प्रत्युत्तर)

कोण आहेत यामिनी जाधव?

मुंबईतील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी यामिनी यशवंत जाधव यांच्या नावाला आधीच पसंती दिली होती. यामिनी यशवंत जाधव सध्या मुंबईतील भायखळा मतदारसंघातून आमदार आहेत. यामिनी जाधव यांनी मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणूनही जबाबदारी पार पाडली आहे. मुंबई महापालिकेच्या बाजार उद्यान समितीच्या त्या अध्यक्षा देखील होत्या. विधिमंडळ शक्ती विधेयक समितीच्या देखील त्या सदस्या होत्या. या समितीमध्ये त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती.

Advertisement

(नक्की वाचा- '...ते चिंधी चोर, मंत्रालयही गुजरातला नेऊन ठेवतील' ठाकरे भडकले)

मुबंईतील महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार

  • दक्षिण मुंबई - यामिनी जाधव (शिवसेना) विरुद्ध अरविंद सांवत (ठाकरे गट)

  • ईशान्य मुंबई- मिहीर कोटेजा (भाजप) विरुद्ध संजय दिना पाटील (ठाकरे गट)

  • दक्षिण मध्य - राहुल शेवाळे (शिवसेना) विरुद्ध अनिल देसाई (ठाकरे गट)

  • उत्तर मुंबई - पियुष गोयल (भाजप) विरुद्ध भूषण पाटील (काँग्रेस)

  • उत्तर मध्य मुंबई - उज्जल निकम (भाजप) विरुद्ध वर्षा गायकवाड (काँग्रेस)

  • उत्तर पश्चिम - रविंद्र वायकर (शिवसेना) विरुद्ध अमोल कीर्तिकर (ठाकरे गट)