आतापर्यंत 12 जागा मिळालेल्या शिंदे गटाच्या नावाखाली आता आणखी दोन मतदारसंघांची भर पडली आहे. शिवसेना शिंदे गटाकडून ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी माजी महापौर नरेश म्हस्के आणि कल्याणमधून श्रीकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
यापुर्वीही शिंदे गटाच्या नेत्यांकडून महायुतीतील 15 जागांवर दावा केला जात होता. त्यामुळे कल्याण, ठाणे, पालघर आणि नाशिक यापैकी तीन जागा तरी मिळाव्यात यासाठी शिंदे गटाकडून प्रयत्न केले जात होते. दरम्यान यापैकी दोन जागा पारड्यात पाडून घेण्यात शिंदे गटाला यश आलं आहे. ठाणे आणि कल्याण ही जागा शिंदे गटाला मिळाली आहे.
शिंदे गटाच्या पहिल्या यादीत एकनाथ शिंदे यांचे सुपूत्र श्रीकांत शिंदे यांचं नाव नसल्याने विरोधकांकडून टीका केली जात होती. एकनाथ शिंदे मुलाची जागाही वाचवू शकले नसल्याचं बोललं जात होतं. मात्र यानंतर देवेंद्र फडणवीसांनी ही जागा श्रीकांत शिंदेंनाच मिळणार असल्याचं जाहीर केलं होतं.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कल्याण मतदारसंघातून मविआतून ठाकरे गटाचे नेते वैशाली दरेकर यांना उमेदवारी दिली आहे. मनसेमध्ये असताना त्यांना मोठी मतं मिळवण्यात यश आलं होतं. ठाकरे गटात सामील झाल्यानंतर त्यांनी पुन्हा येथून संधी देण्यात आली. वैशाली दरेकर यांनी कल्याण डोंबिवली महापालिकेत विरोधी पक्षनेते म्हणून काम केलं आहे. त्याशिवाय स्थानिक पातळीवर त्यांची चांगली पकड असल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळे श्रीकांत शिंदे यांना कल्याणमधून मोठं आव्हान असणार आहे.
लोकसभा निवडणूक - २०२४ साठी कल्याण लोकसभा मतदारसंघातून श्री. श्रीकांत एकनाथ शिंदे आणि ठाणे लोकसभा मतदारसंघातून श्री. नरेश गणपत म्हस्के यांचे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून नाव घोषित करण्यात आले आहे. त्यांना लोकसभा निवडणुकीसाठी हार्दिक शुभेच्छा !#Shivsena #LokasabhaElection2024 pic.twitter.com/XYJjTUy0r8
— Shivsena - शिवसेना (@Shivsenaofc) May 1, 2024
दुसरीकडे ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी शिंदे गटासह भाजपही आग्रही होते. त्यामुळे गेल्या बऱ्याच दिवसांपासून हा तिढा सुरू होता. ठाण्याची जागा मिळाली असली तरी शिंदे गटाकडून उमेदवाराची चाचपणी सुरू होती. अखेर या जागेवरुन माजी महापौर नरेश म्हस्के यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नरेश म्हस्के यांनी वेळोवेळी पक्षाची बाजू जोरकसपणे मांडताना दिसत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world