जाहिरात
This Article is From May 03, 2024

मविआ सरकार पडणार याची अजित पवारांना कल्पना दिली होती, तानाजी सावंतांचा गौप्यस्फोट

अजित पवारांना कल्पना दिल्यानंतर अवघ्या 2 महिन्यात सरकार पाडल्याचा दावाही तानाजी सावंत यांनी केला आहे. 

मविआ सरकार पडणार याची अजित पवारांना कल्पना दिली होती, तानाजी सावंतांचा गौप्यस्फोट

अझरोद्दीन शेख, धाराशिव

निवडणुकीचा प्रचार म्हटलं की आरोप-प्रत्यारोप आलेच. नेते मंडळी आपल्या भाषणांमध्ये असं काही बोलून जातात की अनेकांच्या भुवया उंचावतात. असंच एक वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री तानाजी सावंत यांनी केलं आहे. महाविकास आघाडी सरकार पडणार याची कल्पना अजित पवार यांना दिली होती, असा गौप्यस्फोट तानाजी सावंत यांनी केला आहे. धाराशिव येथे एका खासगी कार्यक्रमात ते होते. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

महाविकास आघाडी सरकार पडलं त्यावेळी अजित पवार सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होते. सरकार पडण्याआधी बरंच काही सुरु होती. शिवसेनेत काहीतरी सुरु आहे याची  कल्पना आपल्याला होती आणि याबाबत आपण उद्धव ठाकरे यांना सावध केलं होतं, असं अजित पवारांना अनेकदा बोलून दाखवलं होतं. मात्र सरकार पडणार याची कल्पना अजित पवारांना होती, असं तानाजी सावंत यांनी म्हटल्याने अनेकजण चकीत झाले आहेत. अजित पवारांना कल्पना दिल्यानंतर अवघ्या 2 महिन्यात सरकार पाडल्याचा दावाही तानाजी सावंत यांनी केला आहे. 

(नक्की वाचा - कल्याण मतदारसंघात ठाकरे गटाचा उमेदवार बदलणार? आणखी एका नेत्याने फॉर्म भरल्याने ट्विस्ट)

तानाजी सावंत नेमकं काय म्हणाले?

महाविकास आघाडीचे सरकार असताना मी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जाऊन भेटलो होतो. मी त्यांना सांगितल होतं की या महिन्यामध्ये हा तानाजी सावंत  सरकार पाडणार आहे. मी हे झाकून नव्हतं केलं तर सांगून केलं होतं. माझी वृत्ती समोर वार करणारी आहे. पाठीमागून खंजीर खुपसणारी नाही. 

(नक्की वाचा - 'ऐनवेळी मला तिकीट नाकारलं हे माझ्यासाठी...'; भाजप खासदार राजेंद्र गावितांचं मोठं विधान)

त्यावेळी मुख्यमंत्र्यांच्या कानावरीही याबाबत माहिती गेली होती. तेव्हा मुख्यमंत्र्यांना वाटलं नाराज आहे म्हणून बोलतोय आणि त्यांनी विषय सोडून दिला. मात्र मी जे बोललो ते करुन दाखवलं, असं वक्तव्य तानाजी सावंत यांनी केलं. तानाजी सावंत यांचं वक्तव्य राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. यावरुन येत्या काळात राजकीय प्रतिक्रिया उमटणार हे नक्की. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com