जाहिरात
This Article is From May 14, 2024

ठाकरे-शिंदे एकमेकांसमोर येणार? डोंबिवलीत एकाच दिवशी दोन नेते

शेवटच्या टप्प्या मुंबई आणि ठाण्याचा समावेश असल्याने इथे ठाकरे विरूद्ध शिंदे असा सामना रंगणार आहे. मुंबईत ठाकरेंची तर ठाण्यात शिंदेंची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

ठाकरे-शिंदे एकमेकांसमोर येणार? डोंबिवलीत एकाच दिवशी दोन नेते
कल्याण:

मुंबईसह ठाण्यात पाचव्या टप्प्यात मतदान होणार आहे. 20 मेला राज्यातल्या 13 मतदार संघात मतदान होईल. त्यात मुंबई ठाणेसह धुळे दिंडोरी आणि नाशिक लोकसभा मतदार संघाचा समावेश आहे. शेवटच्या टप्प्या मुंबई आणि ठाण्याचा समावेश असल्याने इथे ठाकरे विरूद्ध शिंदे असा सामना रंगणार आहे. मुंबईत ठाकरेंची तर ठाण्यात शिंदेंची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर हे दोन्ही नेते डोंबिवलीत एकाच दिवशी असणार आहेत. त्यामुळे आतापासूनच डोंबिवलीत वातावरण निर्मिती झाली आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

कल्याण लोकसभेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मुलगा श्रीकांत शिंदे हे निवडणूक लढवत आहेत. या मतदार संघात 20 मेला मतदान होणार आहे. तर 18 मे ला प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. या पार्श्वभूमीवर डोंबिवलीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रचारासाठी येणार आहेत. विशेष म्हणजे हे दोन्ही नेते एकाच दिवशी डोंबिवलीत असणार आहेत. 16 मे ला हे दोन्ही नेते डोंबिवलीत असतील. एकनाथ शिंदे हे श्रीकांत शिंदेंसाठी यांच्यासाठी काढण्यात येणाऱ्या प्रचार रॅलीत सहभागी होतील. तर उद्धव ठाकरे हे शिवसेना उमेदवार वैशाली दरेकर यांच्यासाठी जाहीर सभा घेणार आहेत.     

हेही वाचा - राहुल गांधींशी चर्चा करण्यासाठी भाजपानं 'या' नेत्याचं नाव केलं निश्चित
  
कल्याण लोकसभा मतदार संघात शिंदे गटाचे श्रीकांत शिंदे हे मैदानात आहेत. तर ठाकरे गटाकडून वैशाली दरेकर यांनी शिंदें समोर आव्हान उभे केले आहे. या मतदार संघात शिंदेंना चितपट करण्याची रणनिती ठाकरे गटाने आखली आहे. तर शिंदेंनी गेल्या वेळ पक्षा मोठा विजय मिळवण्याची तयारी चालवली आहे. श्रीकांत शिंदे यांनी या आधी दोन वेळा यामतदार संघातून विजयी मिळवला आहे. त्यामुळे ते हॅट्रीक करण्याच्या तयारीत आहेत. शेवटच्या टप्प्यात मुंबई आणि ठाणे असल्याने सर्वांचेच लक्ष हे या दोन्ही ठिकाणी असणार आहे. शिवाय ठाकरे आणि शिंदेच राजकारणाच्या केंद्रस्थानी असणार आहेत.   

Listen to the latest songs, only on JioSaavn.com