जाहिरात
This Article is From Apr 25, 2024

रायबरेलीत गांधी विरूद्ध गांधी? भाजप खेळणार मोठा डाव?

रायबरेलीत गांधी विरूद्ध गांधी? भाजप खेळणार मोठा डाव?
नवी दिल्ली:

काँग्रेसने उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि अमेठी या दोन्ही जागांवर अजूनही आपले उमेदवार जाहीर केलेले नाहीत. त्यामुळे काँग्रेसकडून या मतदार संघात उमेदवार कोण असणार याबाबत सस्पेन्स कायम आहे. रायबरेलीतून प्रियंका गांधी निवडणूक लढण्याची चर्चा आहे. तर अमेठीतून राहुल गांधी किंवा रॉबर्ट वाड्रा हे निवडणुकीच्या मैदानात उतरलीत असे बोलले जात आहे. अशात भाजप मोठा डाव खेळण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. रायबरेलीतून भाजप वरूण गांधी यांनी निवडणूक रिंगणात उतरवण्याची दाट शक्यता आहे. 

हेही वाचा - माढाचं मैदान कोण मारणार? धैर्यशील मोहिते पाटील-रणजितसिंह नाईक निंबाळकरांमध्ये अटीतटीची लढत

रायबरेलीतून भाजप उमेदवार कोण? 

रायबरेलीही काँग्रेसची परंपरागत जागा राहीले आहे. सोनिया गांधी इथून निवडून आल्या होत्या. मात्र यावेळी त्या राज्यसभेवर निवडून गेल्याने त्या लोकसभा लढवणार नाहीत हे निश्चित आहे. अशा वेळी प्रियंका गांधी या काँग्रेसच्या उमेदवार असू शकतात असे बोलले जात आहे. अशा वेळी भाजपने वरूण गांधी यांना त्यांच्या विरोधात उतरवण्याची रणनिती आखल्याचे समजत आहे. वरूण गांधी यांना भाजपने पिलभित लोकसभेतून उमेदवारी नाकारली आहे. अशी स्थितीत त्यांना रायबरेलीतून उमेदवारी दिली जाऊ शकते. त्यामुळे तिथे गांधी विरूद्ध गांधी अशी लढत होऊ शकते. एका बाजूला काँग्रेसचे गांधी तर दुसऱ्या बाजूला भाजपचे गांधी अशी ही लढत होईल. 

प्रियांका गांधी राहुल गांधीं बाबत सस्पेन्स  

काँग्रेस उत्तर प्रदेशातून सतरा जागांवर निवडणूक लढवत आहेत. त्यातील पंधरा ठिकाणचे उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. मात्र रायबरेली आणि अमेठी बाबत अजूनी सस्पेन्स कायम आहे. रायबरेलीतून प्रियंका गांधी यांनी लढावे अशी काँग्रेस श्रेष्ठींची इच्छा आहे. त्यानुसार प्रियंका गांधी यांची टिम मतदार संघात तयारीला लागली आहे. तर वायनाड लोकसेभेसाठी 26 एप्रिलला मतदान होत आहे. त्यानंतर अमेठीचा उमेदवार जाहीर केला जाईल अशी चर्चा आहे. राहुल गांधींनाच अमेठीतून लोकसभेसाठी उतरवले जाऊ शकते. शिवाय रॉबर्ट वाड्रा यांचीही अमेठीतून लढण्याची इच्छा आहे.    

अमेठीमध्ये स्मृती इराणी रिंगणात 

अमेठी लोकसभा मतदार संघातून भाजपने स्मृती इराणी यांना मैदानात उतरवले आहे. 2019 च्या निवडणुकीत स्मृती इराणी यांनी इथून राहुल गांधी यांचा पराभव केला होता. सलग दुसऱ्या वेळी हा मतदार संघ काबीज करण्यासाठी त्या सज्ज झाल्या आहेत. मात्र त्यांच्या विरोधात कोण लढणार हे अजूनही स्पष्ट झाले नाही. अमेठी लोकसभेत पाच विधानसभा मतदार संघ येतात. त्या पैकी तिन ठिकाणी भाजपचे आमदार आहेत, तर दोन ठिकाणी समाजवादी पार्टीचे आमदार आहे. मात्र त्या दोघांनीही राज्यसभा निवडणुकीत भाजपला साथ दिली होती.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com