जाहिरात
Story ProgressBack

विधानपरिषदेची निवडणूक जाहीर; 11 जागांसाठी 12 जुलैला होणार मतदान

Vidhan Parishad Election 2024 : येत्या 12 जुलै रोजी विधानपरिषदेसाठी मतदान आणि मतमोजणी होणार आहे. तर 2 जुलै ही अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे.

Read Time: 2 mins
विधानपरिषदेची निवडणूक जाहीर; 11 जागांसाठी 12 जुलैला होणार मतदान

राज्यसभेनंतर विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. येत्या 12 जुलै रोजी विधानपरिषदेसाठी मतदान आणि मतमोजणी होणार आहे. तर 2 जुलै ही अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. 16 जुलैच्या आधी ही मतदान प्रक्रिया पूर्ण करायची आहे. 

कसा असेल निवडणुकीचा कार्यक्रम?

  • 25 जून - अधिसूचना जारी
  • 2 जुलै - अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख
  • 3 जुलै - अर्ज छाणणी
  • 5 जुलै - अर्ज मागे घेण्याची तारीख
  • 12 जुलै - मतदान (सकाळी 9 ते दुपारी 4)
  • 12 जुलै - मतमोजणी (संध्याकाळी 5 वाजता)
     

(नक्की वाचा - IAS Officers Transfer : राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, पाहा संपूर्ण यादी)

कोणत्या आमदारांचा कार्यकाळ संपला? 

मनीषा कायंदे (शिवसेना, शिंदे गट), भाई गिरकर (भाजप), निलय नाईक राष्ट्रवादी, (अजित पवार गट), बाबाजानी दुरानी (राष्ट्रवादी अजित पवार गट), अनिल परब (शिवसेना, ठाकरे गट), रमेश पाटील (भाजप), वजहत मिर्झा (काँग्रेस), रामराव पाटील (भाजप) , प्रज्ञा सावंत (काँग्रेस), महादेव जानकर (रासप), जयंत पाटील (शेकाप) या आमदार यांच्या जागा रिक्त होणार असल्याने ही निवडणूक होणार आहे. 

राज्यपाल नियुक्त आमदारांबाबतची सुनावणी लांबणीवर

राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्ती बद्दल उच्च न्यायालयातील सुनावणी लांबणीवर पडली आहे. आज होणारी सुनावणी उच्च न्यायालयाच्या मुख्य खंडपीठने पुढे ढकलली. आज सुनावणी घेण्यास न्यायालयाने नकार दिला. वारंवार सुनावणी पुढे जात असल्याने सुनावणी लवकर घेण्याची मागणी वकिलांची केली होती. न्यायालयाने देखील तारीख निश्चित करण्याचं मान्य केलं आहे. 

(नक्की वाचा -  मराठा आरक्षणाबाबत शिंदे सरकार अ‍ॅक्शन मोडवर, घेणार मोठा निर्णय?)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
Previous Article
लोकसभेनंतर काँग्रेस विधानसभेच्या तयारीला, 'या' राज्यांवर आहे लक्ष
विधानपरिषदेची निवडणूक जाहीर; 11 जागांसाठी 12 जुलैला होणार मतदान
Indapur Vidhan Sabha Election Dattatray Bharne Harshvardhan Patil Ajit Pawar Devendra fadnavis
Next Article
इंदापूरची जागा वाढवणार महायुतीची डोकेदुखी, पवार-फडणवीस कसा सोडवणार तिढा?
;