जाहिरात

महाराष्ट्रातून मोदींच्या मंत्रीमंडळात कोणाला संधी? 'ही' नावे आहेत चर्चेत

मोदींच्या नव्या मंत्रीमंडळात कोणाला संधी मिळणार याची चर्चा सध्या सुरू आहे. इच्छुकांनी दिल्ली गाठली आहे. त्यांच्या गाठीभेटी सुरू आहेत.

महाराष्ट्रातून मोदींच्या मंत्रीमंडळात कोणाला संधी? 'ही'  नावे आहेत चर्चेत
मुंबई:

नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. एनडीएच्या सरकारची केंद्रात स्थापना होईल. मोदींच्या नव्या मंत्रीमंडळात कोणाला संधी मिळणार याची चर्चा सध्या सुरू आहे. इच्छुकांनी दिल्ली गाठली आहे. त्यांच्या गाठीभेटी सुरू आहेत. अशात महाराष्ट्रातून मोदींच्या मंत्रीमंडळात कोण असेल याची चर्चा सुरू आहे. शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या खासदारांना मंत्रीपदी वर्णी लागणार आहे. मात्र ती नावे कोण हे मात्र गुलदस्त्यात आहेत. मात्र काही नावांची चर्चा होत आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

भाजपकडून केंद्रात कोणाला संधी? 

नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळात महाराष्ट्रातून नितीन गडकरींची वर्णी लागणार हे जवळपास निश्चित आहे. त्याच बरोबर पियुष गोयल हेही नव्या मंत्रीमंडळात असतील अशी चर्चा आहे. या दोन नावां शिवाय अजून भाजप कोणाला संधी देणार याबाबत उत्सुकता आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा भाजपला लोकसभेत त्रासदाय ठरला. त्यामुळे मराठा नेत्याला मंत्रीपदाची संधी दिली जावू शकते. त्यामध्ये विद्यमान मंत्री नारायण राणे, अशोक चव्हाण, उदयनराजे भोसले यांच्या नावाची चर्चा आहे. तर महिलांमधून रक्षा खडसे आणि स्मिता वाघ यांच्या नावाचाही विचार होवू शकतो. महाराष्ट्रातून भाजपचे फक्त 9 खासदार निवडून आले आहेत. 

हेही वाचा -  कशी असेल पीएम मोदींची नवी टीम, कोण कोण होणार मंत्री? जाणून घ्या इनसाइड स्टोरी

शिंदेंच्या सेनेतून कोणाचे नाव आघाडीवर? 

एकनाथ शिंदे यांचे सात खासदार लोकसभेत पोहोचले आहेत. त्यांच्या वाट्याला दोन मंत्री पदे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्या एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपदाचा समावेश आहे. मात्र या दोन ठिकाणी कोणाला संधी मिळणार याची चर्चा सुरू आहे. शिंदे गटातून निवडून आलेल्या खासदारात प्रतापराव जाधव आणि श्रीरंग बारणे हे वरिष्ठ आहेत. त्यामुळे त्यांना संधी दिली जाईल अशी चर्चा आहे. तर संदीपान भूमरे हे राज्यात मंत्री आहेत. त्यांना मंत्रीपदावर पाणी सोडावे लागेल. त्यामुळे त्यांनाही मंत्रीपदाची संधी दिली जाते का ते पाहावे लागेल. नरेश म्हस्के आणि रविंद्र वायकर हे पहिल्यांदाच निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांना संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असल्याने केंद्रात मुलाला पण मंत्रीपद देण्याचे ते टाळतील. त्यात धैर्यशिव माने यांचाही विचार होवू शकतो. मात्र सात जणां पैकी कोणाची वर्णी मंत्रीमंडळात लागते हे पाहावे लागणार आहे. त्यात राज्यसभेवर असलेले मिलींद देवरा यांचे नावही अचानक पणे पुढे येवू शकते. 

हेही वाचा -  कोकण पदवीधर मतदार संघातून मनसेची माघार, कारण काय?

राष्ट्रवादीतून पटेल की तटकरे? 

लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदरी निराशा आली. त्यांचा केवळ एक खासदार निवडून आला. केंद्रीय मंत्रीमंडळात त्यांच्या वाट्याल एक मंत्रीपद येण्याची शक्यता आहे. त्यावर जेष्ठ नेते प्रफुल्ल पटेल किंवा सुनिल तटकरे यांची वर्णी लागणार आहे. सुनिल तटकरेंना मंत्री करावे अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे. पण पटेल हे या आधीही केंद्रात मंत्री राहीले आहेत. शिवाय दिल्लीत त्यांची चांगली उटबस आहे. त्यामुळे त्यांनाच प्राधान्य मिळेल अशी चर्चा आहे. यावर अजित पवार निर्णय घेणार आहेत. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com