जाहिरात

Nagpur Election : नागपूर पालिकेतील सर्वात श्रीमंत उमेदवार; 9 वर्षांत 78 कोटींनी वाढ; आकडा पाहून भुवया उंचावतील

नागपूर महापालिका निवडणुकीत सर्व उमेदवारांचे अर्ज दाखल झाले असून प्रतिज्ञापत्रांमधून उमेदवारांची संपत्ती उघड झाली आहे.

Nagpur Election : नागपूर पालिकेतील सर्वात श्रीमंत उमेदवार; 9 वर्षांत 78 कोटींनी वाढ; आकडा पाहून भुवया उंचावतील

Nagpur Municipal Corporation Election : महानगरपालिका निवडणुकीला अवघे सात दिवस शिल्लक राहिले आहेत. पक्षांनी आपआपले शिलेदार मैदानात पाठवले असून आता उमेदवारांना मैदान गाजवायचं आहे. दरम्यान नागपूरमध्ये एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. नागपूर महानगरपालिका निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रातून मोठी माहिती समोर आली आहे. 

नागपूर महापालिका निवडणुकीत सर्व उमेदवारांचे अर्ज दाखल झाले असून प्रतिज्ञापत्रांमधून उमेदवारांची संपत्ती उघड झाली आहे. नगरसेवक पदाची निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांच्या संपत्तीचा आकडा पाहून कुणाच्याही भुवया उंचावतील. प्रभाग क्रमांक १ मधील भाजप उमेदवार वीरेंद्र कुकरेजा सर्वाधिक श्रीमंत उमेदवार ठरले आहेत. कुकरेजांच्या कुटुंबाची एकूण मालमत्ता ९४ कोटी ९४ लाखांहून अधिक आहे. त्यांचं वार्षिक उत्पन्न ६ कोटींहून अधिक आहे. ते व्यवसायाने व्यापारी आहेत. २०१७ मध्ये कुकरेजांची संपत्ती १६ कोटींच्या घरात होती. ९ वर्षांत तब्बल ७८  कोटींची वाढ झाली आहे. कुकरेजांचे प्रतिस्पर्धी सुरेश जग्ग्यासी यांची एकूण मालमत्ता ३ कोटी १४ लाखांच्या घरात आहे. 

Nagpur News : आईला मुखाग्नी देत होते योगेश गोन्नाडे, शिवसेनेने स्मशानभूमीतच सोपवलं तिकीट

नक्की वाचा - Nagpur News : आईला मुखाग्नी देत होते योगेश गोन्नाडे, शिवसेनेने स्मशानभूमीतच सोपवलं तिकीट

संपत्ती दुपटीने वाढली...

महिलांमध्येही संपत्तीचा आकडा मोठा असलेल्या उमेदवारांची संख्या जास्त आहे. यात प्रभाग १० ‘क' मधून वैशाली चोपडे आघाडीवर आहे. वैशाली चोपडे यांच्या कुटुंबाची संपत्ती ५८ कोटी १३ लाखांच्या घरात आहे. काँग्रेस उमेदवार सीमा डवरे यांच्या कुटुंबाची संपत्ती १ कोटी ३७ लाख इतकी आहे. मात्र प्रभाग 23 मधील राष्ट्रवादी (शरद पवार गट) दुनेश्वर पेठेंच्या संपत्तीत घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. पेठेंची मालमत्ता १३.९१ कोटींवरून घसरून १२.४९ कोटींवर गेली आहे. याशिवाय पेठेंवर १.२४ कोटींचं कर्ज ही आहे. भाजप उमेदवार नरेंद्र बोरकरांची मालमत्ता वाढली आहे. नरेंद्र बोरकरांची संपत्ती २.४० कोटींवरून आता ५.१७ कोटींवर पोहोचली आहे. मनपा निवडणुकीत विकासासोबतच उमेदवारांच्या संपत्तीचीही जोरदार चर्चा सुरू आहे. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com