जाहिरात

Mayor Reservation: तयारी दोघांची लॉटरी तिसऱ्याला!'या' महापालिकेत आरक्षणामुळे महापौरपदाचा गेम फिरला

जालन्यात रावसाहेब दानवे यांनी आपले बंधू भास्कर दानवे आणि वहिनी सुशीला दानवे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं.

Mayor Reservation: तयारी दोघांची लॉटरी तिसऱ्याला!'या' महापालिकेत आरक्षणामुळे महापौरपदाचा गेम फिरला
  • जालन्यातील पहिल्या महानगरपालिका निवडणुकीत भाजपाने 65 पैकी 41 जागा जिंकून सत्ता एकहाती मिळवली आहे
  • रावसाहेब दानवे आणि कैलास गोरंट्याल यांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांना महापौरपदासाठी निवडणुकीत उतरवलं होतं
  • महापौरपदासाठी आरक्षण जाहीर केल्यावर पद अनुसूचित महिला प्रवर्गासाठी राखीव करण्यात आलं आहे
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
जालना:
लक्ष्मण सोळुंके

महापालिकेच्या निवडणुकांचा निकाल लागला. त्यानंतर सर्वांचे लक्ष महापौरपदाच्या आरक्षणाकडे लागले होते. त्यापदावर अनेकांचा डोळा होता. पण आरक्षण जाहीर झाल्यानंतर अनेकांचा हिरमोड झाला आहे. काहींनी हे पद मिळावे म्हणून घरातीलच दोन- दोन जणांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. पण त्यांच्या अपेक्षे प्रमाणे महापौरपदाची सोडत लागली नाही. तसाच काहीसा प्रकार जालना महापालिकेत घडली आहे. इथं भाजप नेते कैलास गोरंट्याल आणि रावसाहेब दानवे यांनी महापौरपदासाठी आपल्या नातेवाईकांसाठी फिल्डींग लावली होती. पण सोडत समोर येताच या दोघांचा हिरमोड झाला. फायदा मात्र तिसऱ्याचाच होणार हे आता स्पष्ट झालं आहे. 

जालन्यात पहिल्यांदाच महानगरपालिका निवडणूक झाली. निवडणुकीत 65 पैकी 41 जागा जिंकत भाजपाने मोठं यश मिळवलं. महापालिकेवर भाजपाने एक हाती सत्ता मिळवली आहे. या पहिल्या महानगरपालिका निवडणुकीत आपल्या कुटुंबातीळ सदस्य पहिला महापौर व्हावा म्हणून रावसाहेब दानवे, कैलास गोरंट्याल यांनी आपल्या कुटूंबातील सदस्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं.  मुलगा,भाऊ ,पत्नी,वहिनी यांना उमेदवारी देत विजय देखील खेचून आणला होता. पण ज्या वेळी महापौरपदाच्या आरक्षणाची घोषणा झाली त्यावेळी मात्र उलटचं घडलं. 

नक्की वाचा - Mayor Reservation Lottery Live: मुंबई, पुणे,नाशिकचा महापौर खुल्या प्रवर्गाचा होणार

जालन्यात रावसाहेब दानवे यांनी आपले बंधू भास्कर दानवे आणि वहिनी सुशीला दानवे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं. तर कैलास गोरंट्याल यांनी आपल्या पत्नी संगीता गोरंट्याल आणि मुलगा अक्षय गोरंट्याल यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवून पहिला महापौर आपल्याच कुटुंबातील होईल होण्याचं स्वन रंगवलं होतं. पहिला महापौर दानवे की गोरंट्याल अशा चर्चा ही शहरात रंगत असताना आज आरक्षण सोडतीत महापौरपद अनुसुचित महिला प्रवर्गासाठी राखीव सुटलं. त्यामुळे या मातब्बर नेत्यांचे स्वप्न भंगलं आहे. 

नक्की वाचा - Mayor Reservation Lottery: 15 महानगरपालिकांमध्ये 'महिला'राज! कुठे-कुठे असणार महिला महापौर? पाहा संपूर्ण यादी

दरम्यान दुसरीकडे जालन्यात अनुसुचित महिला प्रवर्गातून निवडून आलेल्या भाजपच्या रूपा कुरील,वंदना मगरे, श्रद्धा साळवे,रिमा खरात यांना पहिला महापौर होण्याची संधी चालून आली आहे. या महिला नागरसेविकांचा उत्साह वाढला आहे.  रूपा कुरील ह्या भाजपच्या जुन्या कार्यकर्त्या व राबसाहेब दानवे यांच्या खंद्या समर्थक आहेत. तर वंदना मगरे ह्या दुसऱ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आल्या असून कैलास गोरंट्याल यांच्या कट्टर समर्थक आहेत.  जालना महानगरपालिकेच्या पहिल्या महापौरपदी कुणाची वर्णी लागते हे पाहणं आता म्हत्वाचं ठरणार आहे.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com