वंचितने बारामतीत उमेदवार का दिला नाही? प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं पडद्यामागे काय घडलं?

एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे अशी निवडणूक 12 मतदारसंघात दिसत आहे. याचा फायदा वंचित बहुजन आघाडीला होताना दिसत आहे, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
पुणे:

प्रतीक्षा पारखी, पुणे

प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने राज्यभरात अनेक उमेदवार दिले आहेत. मात्र बारामतीत वंचितने आपला उमेदवारी निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेला नाही. त्यामुळे वंचितन बारामतीत उमेदवार का दिला नाही? असा प्रश्न उपस्थित होत होता. त्यावर स्वत: प्रकाश आंबेडकर यांनी उत्तर दिलं आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

बारामतीत उमेदवारी का दिला नाही याबाबत बोलताना प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं की, सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांनी विनंती केल्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघात वंचितने उमेदवार दिला नाही. पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार वसंत मोरे यांच्या प्रचारार्थ घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

प्रकाश आंबेडकरांनी पुढे म्हटलं की, यावेळी आम्ही आमचं लोकसभेचे खात नक्की उघडू. एक घटक तुम्ही कोणी लक्षात घेतला नाही. वसंत मोरे यांची एक जमेची बाजू आहे ती म्हणजे अजान आणि भोंग्याची. त्यामुळे मुस्लीम समाज पूर्णपणे वन साईड त्यांच्या बाजूने जाईल अशी परिस्थिती पुण्याची आहे.  वसंत मोरे यांनी मुस्लिमांची बाजू घेतली म्हणून डावललं जात होतं. ज्याला वगळला जात होतं, आम्ही त्याच्या बाजूने उभे राहिलो. पुण्यातील लोकसभेचा सामना अटीतटीचा आहे, असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं. 

(नक्की वाचा- माढ्यासाठी भाजपची साम-दाम-दंड-भेद ची रणनिती, शरद पवारांचा आणखी एक मोहरा गळाला?)

ठाकरे-शिंदे वादाचा वंचितला फायदा

एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे अशी निवडणूक 12 मतदारसंघात दिसत आहे. याचा फायदा वंचित बहुजन आघाडीला होताना दिसत आहे. जो धर्मनिरेपक्ष मतदार आहे, मग तो राष्ट्रवादी काँग्रेसचा असेल किंवा काँग्रेसचा असेल तो आमच्याकडे वळल्याचे दिसत असल्याचेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं.

Advertisement

नक्की वाचा- सूरतनंतर आता इंदूर! काँग्रेस उमेदवारानं घेतला अर्ज मागं

कल्याण मतदारसंघात वैशाली राणे यांना शिवसेना ठाकरे गटाने उमेदवारी दिली आहे. मात्र तो उमेदवार कमजोर आहे, असे मानले जात आहे. मुस्लीम समाज त्या मतदासंघात जास्त आहे. जिथे मुख्यमंत्री आणि ठाकरे यांचे हाडवैर आहे, तिथेच कमजोर उमेदवार देणे यावरूनच शंका निर्माण झाली असल्याचेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं.